---Advertisement---

चालू घडामोडी : १९ मार्च २०२०

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Current Affairs 19 March 2020

परराष्ट्र खात्यातील अधिकारी राजेश स्वामी यांचे दिल्लीत निधन

परराष्ट्र खात्यातील संचालक राजेश स्वामी (४५) यांचे बुधवारी नवी दिल्लीत अल्प आजाराने निधन झाले. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून तहसीलदार म्हणून सरकारी सेवेची सुरुवात केली होती.
त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून ते परराष्ट्र सेवेत (आयएफएस) दाखल झाले. विविध देशांत भारताचे राजदूत म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली. त्यानंतर इजिप्त, केनियाचे उपउच्चायुक्त म्हणून काही काळ सेवा बजावली.

नेमबाजी : सौरभ ऑलिम्पिक संघ निवड चाचणी १० मी. एअर पिस्तूलमध्ये अव्वल

image 2

सौरभ चौधरी व ऐश्वर्या प्रताप सिंगने ऑलिम्पिक नेमबाजी संघ निवड चाचणी पात्रतेमध्ये अव्वलस्थान गाठले. १७ वर्षीय सौरभने १० मी. एअर पिस्तूलमध्ये ५८८ गुण मिळवले.
राष्ट्रीय रायफल असोसिएशन आॅफ इंडियाद्वारे आयोजित चाचणीत ऐश्वर्याने ५० मी. रायफल थ्री पोझिशनमध्ये ११७८ गुणांची कमाई केली. १० मी. एअर रायफल अभिषेक वर्मा (५८५) व अन्नुराज सिंग (५७९) पहिल्या स्थानी आहे.

जागतिक स्तरावरील अव्वल ५०० NGO च्या यादीत ‘ब्रॅक’ अव्वलस्थानी

जागतिक स्तरावरील अव्वल ५०० NGO च्या यादीत 'ब्रॅक' अव्वलस्थानी

जागतिक स्तरावरील अव्वल ५०० NGO च्या यादीत ‘ब्रॅक’ अव्वलस्थानी आहे. अव्वल जागतिक स्वयंसेवी संस्थांची यादी जिनीव्हा आधारित स्वयंसेवी संस्था अ‍ॅडव्हायझर यांच्याकडून जाहीर करण्यात आली. ब्रॅक ही आंतरराष्ट्रीय विकास संस्था आहे.
बांगलादेशस्थित आंतरराष्ट्रीय विकास संघटना ब्रॅकने सलग ५ व्या वर्षी या यादीत पहिला क्रमांक कायम अबाधित ठेवला आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now