पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल गोलकीपर्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतात यशस्वीरित्या स्वच्छता अभियान राबवण्यात येत असल्यामुळे मोदींचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. दरम्यान, ज्या लोकांना हे अभियान जनआंदोलनात बदलले त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्काराचा स्विकार करतेवेळी दिली.
अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
भरतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. माहीती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर याबाबतची माहीती दिली आहे. दोन पिढ्यांचे मनोरंजन करणारे आणि लाखो जणांना प्रेरणा देणारे दिग्गज अमिताभ बच्चन यांची दादासाहब फाळके पुरस्कारासाठी एकमुखी निवड झाली आहे. हे जाहीर करताना संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय समुदाय आनंदी आहे.
1970 च्या दशकात “जंजीर’, “दीवार’ आणि “शोले’ सारख्या चित्रपटांनी युवा पिढीचे ‘अँग्री यंग मॅन’ बनलेल्या 76 वर्षीय अमिताभ बच्च्न यांची जुन्या चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट घैतली. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी चर्चा व्दीपक्षीय संबंधावर चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींचे तोंडभरून कौतूक केले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख फादर ऑफ इंडिया असा केला आहे.
लिओनेल मेसीच सर्वोत्तम!
विश्वातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जेटिनाच्या लिओनेल मेसीने प्रथमच ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर नाव कोरले. महिलांमध्ये विश्वविजेत्या अमेरिकेच्या मेगान रॅपिनोने सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली. ला स्काला ओपेरा हाऊस, इटली येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात मेसीने यंदाच्या चॅम्पियन्स लीगमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या लिव्हरपूलच्या व्हर्गिल व्हॅन डिकवर सरशी साधून अव्वल क्रमांक मिळवला.
२०१६पासून सुरू झालेल्या ‘फिफा’च्या पुरस्कारांवर दोन वेळा रोनाल्डोने (२०१६ व २०१७), तर एकदा क्रोएशियाच्या लुका मॉड्रिचने (२०१८) वर्चस्व गाजवले आहे. परंतु एकंदर कारकीर्दीतील विविध पुरस्कारांमध्ये मेसीने सहाव्यांदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला.
किम ह्युन यांचा राजीनामा!
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या कोरियाच्या किम जी ह्य़ुन यांनी महिला एकेरीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. पतीच्या आजारपणामुळे किम यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला
भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे (बीएआय) किम यांची या वर्षीच फेब्रुवारीत भारताच्या महिला खेळाडूंसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले.