सौदी अरेबिया भारतात करणार शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
भारताच्या संभाव्य विकास वाढीची दखल घेत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा आणि खाण आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे.
सऊद बिन मोहम्मद अल सती म्हणाले, “तेल, गॅस, खाण क्षेत्रांत सौदी अरेबियासाठी भारत हे आकर्षक गुंतवणुकीचे ठिकाण आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सौदी भारताकडे पाहत आहे. ऊर्जा, तेल शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कृषि, खनिजे आणि खाण क्षेत्रात सौदी अरेबिया शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे,
शांता रंगास्वामी यांचा राजीनामा!
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नीती अधिकारी डी. के. जैन यांनी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे शांता रंगास्वामी यांनी क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) सदस्य आणि भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनच्या (आयसीए) संचालकपदाचा राजीनामा दिला.
क्रिकेट सल्लागार समितीने (त्या वेळची अस्थायी समिती) डिसेंबर महिन्यात डब्ल्यू. व्ही. रामन यांची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. शास्त्री यांनी दुसऱ्यांदा दोन वर्षांच्या कालावधीसाठी मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. भारताचे प्रशिक्षकपद सांभाळण्याची शास्त्री यांची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी क्रिकेट व्यवस्थापक (२००७चा बांगलादेश दौरा), संघ संचालक (२०१४-२०१६) आणि मुख्य प्रशिक्षक (२०१७-२०१९) अशा भूमिका निभावल्या आहेत.
हॅमिल्टनला विजेतेपद!
फेरारीची विश्वासार्हता आणि तांत्रिक समस्यांचा फायदा उठवत मर्सिडिझ संघाच्या लुइस हॅमिल्टन याने गेल्या तीन शर्यतींपासूनची फेरारीची मक्तेदारी मोडीत काढत रशियन ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीचे विजेतेपद पटकावले.
पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या हॅमिल्टनने ३.८२९ सेकंदाच्या फरकाने आपलाच सहकारी वाल्टेरी बोट्टास याला मागे टाकत जेतेपद संपादन केले. आता हॅमिल्टनने (३२२ गुण) ७३ गुणांच्या फरकाने ड्रायव्हर्स अजिंक्यपद स्पर्धेत अग्रस्थान कायम राखले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे मुंबईत निधन
मुंबई: ‘शोले’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘कालिया’च्या भूमिकेद्वारे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने दक्षिण मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांचे अभिनय कौशल्य आणि संवादफेक अप्रतिम असल्याने त्या दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या