---Advertisement---

स्टिव्हन स्मिथने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

By Saurabh Puranik

Published On:

steven-smith-sachin-tendulkar
---Advertisement---

अॅशेस मालिकेत कर्णधार स्टिव्हन स्मिथने शानदार शतक झळकवून भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला. स्मिथने सचिनचा कसोटी क्रिकेटमधील वेगवान 21 शतकांचा विक्रम मोडला. स्मिथने आज इंग्लंडविरुद्ध 21 वे शतक झळकावले पण त्याने 105 डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली तेच सचिनने 110 डावांमध्ये 21 शतके झळकवली होती. वेगवाने 21 कसोटी शतके झळकावणा-या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी फक्त 56 डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली होती. दुस-या स्थानावर भारताचेल लिटील मास्टर सुनिल गावसकर आहेत. त्यांनी 98 कसोटी डावांमध्येच हा टप्पा गाठला होता. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ पाचव्या स्थानावर आहे. त्याने 120 डावात 21 शतके झळकवली होती.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now