2जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने गुरुवारी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
गुरुवारी सुनावणी झालेली दोन प्रकरणे सीबीआयची तर एक प्रकरण अंमलबजावणी संचालनालयाचे आहे. एक लाख 76 हजार कोटींच्या या घोटाळ्यात युपीए सरकारचे दूरसंचार मंत्री राहिलेले ए राजा आणि डीएमके नेते कनिमोझी यांच्यासह अनेक आरोपी होते. 2010 मध्ये कॅग विनोद राय यांच्या रिपोर्टमध्ये या घोटाळ्याचा खुलासा झाला होता. 2जी प्रकरणात ट्रायल 6 वर्षांपूर्वी 2011 मध्ये सुरू झाले होते. कोर्टाने त्यावेळी 17 आरोपींवर आरोप निश्चिती केली होती.