---Advertisement---

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत

By Saurabh Puranik

Published On:

cotton_-bollworm
---Advertisement---

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत, धानाला हेक्टरी ७ हजार ९७० रुपये ते १४ हजार ६७० रुपये मदत आणि प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिला जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राहील.

cotton bollworm कापसाला दिली जाणारी मदत ही एनडीआरफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक), पीक विमा योजना व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत मिळणारी मदत, असे तिन्ही एकत्रित करून दिली जाईल. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्याला प्रती हेक्टरी एनडीआरफमधून ६ हजार ८०० रुपये, पीक विमा अंतर्गत ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत १६ हजार रुपये असे एकूण ३० हजार ८०० रुपये मिळतील. बागायती कापूस उत्पादकाला प्रती हेक्टरी एनडीआरफमधून १३ हजार ५०० रुपये, पीक विमा अंतर्गत ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत १६ हजार रुपये असे एकूण ३७ हजार ५०० रुपये मिळतील. कोरडवाहू धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी एनडीआरफमधून ६८०० रुपये व पीक विमा अंतर्गत ११७० रुपये असे एकूण ७ हजार ९७० रुपये मिळतील. ओलिताच्या धान उत्पादकांना प्रती हेक्टरी एनडीआरफमधून १३ हजार ५०० रुपये, पीक विमा अंतर्गत ११७० रुपये असे एकूण १४ हजार ६७० रुपये मिळतील. याशिवाय धानाला प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिला जाईल व ही मर्यादा ५० क्विंटलपर्यंत असेल, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now