⁠
Uncategorized

युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील पहिली प्रज्ञाचक्षु प्रांजली पाटीलची उत्तुंग भरारी

BLIND_Girl_Pranjali_Patil_UPSC

जळगाव – युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात वडजी ता. बोदवड येथील (माहेर) व सध्या उल्हासनगर येथे राहणारी मुळचे ओझारखेडा, भुसावळ तालुक्यातील (सासर) प्रज्ञाचक्षु (अंध) प्रांजली लहेनसिंग पाटीलने उत्तुंग यश प्राप्त केले आहे. तिने या परीक्षेत 773 रँक प्राप्त केली असून, प्रांजली ही ‘मनोबल’ या देशातील पहिल्या अशा प्रज्ञाचक्षु (अंध) व विशेष अपंग) विद्यार्थ्यांसाठीच्या निवासी स्पर्धा परीक्षा केंद्राची तज्ञ मार्गदर्शिका आहे . निकाल कळताच प्रांजलीच्या यशामुळे दीपस्तंभ मनोबल केंद्रातील सर्वच विदार्थ्यांनी उत्साही वातावरणात एकच जल्लोष केला.

प्रांजली ही लहानपणापासून हुशार तिला लहानपणी कमी दिसत होते. तेव्हाच तिच्या डोळ्यांची तपासणी केली असता, डॉक्टरांची नजर कमी असल्याचे सांगून तिला वयाच्या बाराव्या वर्षानंतर अंधत्व येईल, ही माहिती तिच्या वडिलांना दिली होती. तेव्हापासून तिच्या आई – वडिलांना चिंता लागली. प्रांजलीला स्वतःच्या पायावर उभे करण्याचा निर्धार तिच्या आई – वडिलांनी मनाशी बाळगला. त्यांनी प्रांजालीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले. दुसरीत असतांना एका विद्यार्थ्याने तिच्या डोळ्यांवर पेन्सिल मारली होती. त्यात तिचा डोळा अधू झाला होते.प्रांजली तिसरीला असतांना चाळीसगाव येथे मामांच्या लग्नाला कुटुंबासमवेत आली होती. तेव्हा ती चाळीसगावलाच या लग्नात आजारी पडली. यातच तिचा दुसरा डोळाही अधू झाला.

प्रांजलीच्या जीवनात अंधत्व आल्याने तेव्हाच तिच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले, प्रांजलीच्या आई – वडिलांनी हार न मानता, तिला धीर दिला. प्रांजलीचे चौथीते दहावी पर्यंतचे शिक्षण दादर येथील कामाला मेहता अंध शाळेतपूर्ण केले. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तेर्ण झाल्यानंतर चांदीबाई महाविद्यालयात शिक्षण घेतांना 12 वीच्या परीक्षेत 85 टक्के गुण प्राप्त करत कला शाखेत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यानंतर झेव्हीअर्स महाविद्यालयातून बी ए ची पदवी प्राप्त करून विद्यापिथातूनही प्रथम क्रमांक पटकाविला. यशामागे येणारे यश यामुळे प्रांजलीचे आत्मबल वाढले व तिने वडिलांकडे आय ए एस होण्याची इच्छा व्यक्त केली. दिल्ली येथील जे एन यु विद्यापिठात प्रवेश घेण्यासाठी तिने तयारी सुरु केली. तिला प्रवेशही मिळाला व तेथून एम फील केले. याच विषयात ती आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध यावर ती संशोधन करीत आहे.

“माझ्या यशात आई – वडील ,पती , मित्रपरिवार, नातेवाईक व शिक्षकांचा मोठा वाटा आहे . जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने राहण्यासह उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा यामुळेच अंधत्वावर मात करून हे यश मी प्राप्त करू शकली आहे . यापुढे दीपस्तंभ मनोबल केंद्रातील प्रज्ञाचक्षु व विशेष विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी सतत मार्गदर्शन करीत राहील.” – प्रांजली पाटील

मुळचे ओझरखेडा, भुसावळ तालुक्यातील केबल व्यावसायिक कोमलसिंग पाटील यांनी पप्रांजलीला दोनही डोळ्यांनी अंधत्व आल्यानंतर तिच्याशी विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्यांचा विवाह 26 नोव्हेंबर 2014 ला राजपूत समाजात आदर्श विवाह ठरला होता. प्रांजालीला कोमलसिंग पाटील यांची खंबीर साथ मिळाली व प्रांजलीनेही या संधीचे सोने करून दाखविले व सर्वांनाच प्रेराणादायी असे तिचे व्यक्तीमत्व आज या तिच्या यशातून प्रदर्शित होतेय.

दीपस्तंभ मनोबल केंद्रातील प्रज्ञाचक्षु विद्यार्थी प्रतिक्रिया –

“ दीपस्तंभ मनोबल केंद्रात गेल्या 10 महिन्यांपासून आम्ही स्पर्धा परीक्षेंचे प्रशिक्षण घेत असून आम्हाला सखोल असे मार्गदर्शन मिळत आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये आमच्या मार्गदर्शिका प्रांजली ताईच्या या यशामुळे आमचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे . मलाही आय ए एस व्हायचे आहे.” – विश्वनाथ कंधारे (प्रज्ञाचक्षु विद्यार्थी व बँक प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा उत्तीर्ण)

“ प्रांजली ताईने मिळविलेले हे यश आम्हा सर्वांनाच अतिशय आनंद देणारे व स्वप्न पेरण्यासाठी अधिक प्रेरणा देणारे असे आहे . या यशामुळे मुलीही भरपूर यश प्राप्त करू शकतात हे पुन्हा प्रांजली ताईने सिध्द करून दाखविले . यामुळे आमचे आत्मबल वाढले आहे.” – रुचिरा सनदी ( प्रज्ञाचक्षु विद्यार्थिनी )

प्रांजलीच्या यशाबद्दल दीपस्तंभ मनोबल केंद्राचे संचालक प्रा.यजुर्वेंद्र महाजन प्रतिक्रिया व्यक्त केली की , “ अंधत्वाने निर्माण केलेय अडचणींवर मात करून प्रांजलीने स्वतःच्या सामर्थ्यावर दुर्दम्य इच्छाशक्ती ,आत्मविश्वास व परिश्रमाने हे मिळविलेले यश ! हजारो लाखो विद्यार्थ्यांना तसेच अंध नव्हे तर डोळस तर तरुण तरुणींनाही दृढता ,प्रकाश व विश्वास देणारे आहे.”

विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

Related Articles

One Comment

Back to top button