वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत साईखोम मीराबाई चानूने 194 किलो वजन उचलून नवीन विश्वविक्रम रचला आहे. या कामगिरीसह चानूने सुवर्णपदकाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर आहे. 22 वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने भारताकडून पहिली वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. अमेरिकेतील अनहिम येथे आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत चानूने 48 किलो वजनी गटात पहिल्यांदा 85 किलो आणि दुस-यांना 109 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. चानूच्या आधी कर्णम मल्लेश्वरीने 1994 आणि 1995 साली गोल्ड मेडल मिळवले होते. मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकही मिळवले होते. थायलंडच्या सुकचारोन तुनियाने रौप्य आणि सेगुराने इरिसने कांस्यपदक पटकावले. डोपिंगच्या प्रकरणामुळे रशिया, चीन, कझाकस्ता, युक्रेन आणि अझरबैजान या देशाचे वेटलिफ्टर्स स्पर्धेत सहभागी झाले नव्हते.