⁠
Uncategorized

Current Affair 13 November 2018

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात ७० टक्के मतदान

  • छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नक्षलवादग्रस्त बस्तर विभाग आणि राजनांदगाव जिल्ह्य़ासह १८ मतदारसंघांमध्ये सोमवारी ६० ते ७० टक्के मतदान झाले, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सुब्रत साहू यांनी सांगितले.
  • मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ अशी असलेल्या १० मतदारसंघांमध्ये सुमारे ५२ टक्केमतदान नोंदवले गेले; तर सकाळी ८ ते सायंकाळी ५ अशी वेळ असलेल्या मतदारसंघांमध्ये ७०.०८ टक्के मतदान झाले.
  • पहिल्या टप्प्यातील १९० उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री रमण सिंह (राजनांदगाव मतदारसंघ) यांचा समावेश आहे.
  • छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात ९० पैकी १८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची सरासरी ५८.५५ टक्के होती.

भारतात नदीमार्गावर चालणार मालवाहक जहाज

  • वाराणसी दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी गंगा नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील पहिल्या मल्टी मॉडेल टर्मिनलचे उदघाटन केले. आता गंगा नदीमार्गे देशातंर्गत मालवाहक जहाज सेवा सुरु झाली आहे.
  • गंगा-भागीरथ-हुगली हा सागरी मार्ग राष्ट्रीय जलमार्ग १ म्हणून घोषित करण्यात आला.
  • कोलकाता येथून आलेल्या एम.व्ही.रविंद्रनाथ टागोर या मालवाहक जहाजामधून १६ कंटेनर वाराणसीच्या खिडकिया घाटावर उतरवण्यात आले. १६ कंटेनर म्हणजे १६ ट्रकच्या बरोबरीचा हा माल आहे. आता परतीच्या प्रवासात हे जहाज IFFCO च्या प्रकल्पात निर्मिती करण्यात आलेली खते घेऊन जाईल.
  • वाराणसीच्या खिडकिया घाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा पहिला मल्टी मॉडेल टर्मिनल राष्ट्राला समर्पित केला.
  • २०६ कोटी रुपये खर्चून हा मल्टी मॉडेल टर्मिनल बांधण्यात आला आहे. २०० मीटर लांब ४५ मीटर रुंद असलेल्या या जेट्टीवर माल चढवणे आणि उतरवण्यासाठी जगातील अत्याधुनिक क्रेन बसवण्यात आली आहे. जर्मनीमध्ये बनवण्यात आलेल्या या क्रेनची किंमत २८ कोटी रुपये आहे.
  • मल्टी मॉडेल टर्मिनलमुळे थेट ५०० नोकऱ्या आणि २ हजार अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे.

१४ नोव्हेंबरपासून रामायण एक्स्प्रेस सुरु होणार

  • भारतीय रेल्वेने रामायण एक्स्प्रेसची घोषणा केली आहे.
  • रामायण एक्स्प्रेस प्रभू रामचंद्राशी संबंधित सगळ्या स्थळांची यात्रा करणार आहे. यामध्ये श्रीलंकेतील काही ठिकाणांचाही समावेश असणार आहे. तसेच ही एकूण १६ दिवसांची सहल असणार आहे असे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे.
  • १६ दिवसांची ही पॅकेज टूर असणार आहे. एक टूर जाऊन आली की मग दुसरी जाणार आहे. दिल्लीहून या एक्स्प्रेसला हिरवा कंदिल दाखवला जाईल.

‘स्पायडरमॅन’चे जन्मदाते स्टेन ली यांचे निधन

  • कॉमिक्स जगताचे महानायक, मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक आणि स्पायडर मॅन व हल्क यांसारख्या अनेक सुपरहिरोंचे जन्मदाते स्टेन ली यांचे आज लॉस एंजल्स येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
  • कॉमिक्स लेखक, संपादक, चित्रपट निर्माता, अभिनेता आणि प्रकाशक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले स्टेन ली हे मार्वल कॉमिक्सचे बलस्थान होते. ली संपादक झाल्यानंतर मार्वलने कॉमिक्सच्या दुनियेत भरारी घेतली.
  • १९६१ मध्ये ‘द फॅन्टास्टिक फोर’ हे सुपर हिरो असलेले कुटुंब ली यांनी वाचकांच्या हाती दिले. त्याला अफाट प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ली यांनी अनेक सुपरहिरोंना आपल्या लेखणीतून जन्म दिला.
  • स्पायडर मॅन, हल्क, एक्स मॅन, आयरन मॅन, ब्लॅक पँथर, कॅप्टन अमेरिका, अँट मॅन हे सुपरहिरो अवघ्या जगाला मिळाले. पनिशर, डेअरडेव्हिल हे अँटी सुपरहिरोही ली यांनी उभे केले.

स्यू की यांना रोहिंग्या प्रकरण भोवले, अॅमनेस्टीकडून पुरस्कार परत

  • म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवरील दडपशाही आणि त्यांच्यावरील अत्याचाराच्या मुद्यावरुन मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या अॅमनेस्टी या आंतरराष्ट्रीय संस्थेने मोठे पाऊल उचलले आहे.
  • म्यानमारच्या नेत्या आणि स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांना धक्का देत या संस्थेने ९ वर्षांपूर्वी त्यांना दिलेला सर्वोच्च पुरस्कार परत घेतला आहे.
  • म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवर लष्कराकडून झालेल्या अत्याचारावरील त्यांच्या उदासिन भूमिकेमुळे संस्थेने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे स्यू की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे.
  • लंडन येथील जागतिक मानवाधिकारी संघटना अॅमनेस्टी इंटरनॅशनलने सोमवारी आंग सान स्यू की यांचा पुरस्कार परत घेतला. अॅमनेस्टीने २००९ मध्ये स्यू की यांना हा पुरस्कार दिला होता. त्यावेळी त्या मानवाधिकारासाठी नजरकैदेत होत्या.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर स्यू की यांची मानवाधिकारासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळख आहे. त्यांनी आपल्या देशातील लष्करशाही विरोधात आवाज उठवला होता.
  • त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९१ मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही देण्यात आला होता.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

  • पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आजही घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात ०.१३ पैशांनी तर ०.१२ पैशांनी डिझेलच्या दरात कपात झाली आहे. या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा सध्याचा दर ७७.४३ रुपये प्रति लिटर, डिझेल ७२.१९ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल ८२.९४ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ७५.६४ रुपये प्रतिलिटर इतके झाले आहे.

३१ बिगर बॅंकिंग कंपन्यांची नोंदणी रद्द

  • बिगर बॅंकिंग वित्त क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने कडक पावले उचलली आहेत. गैरप्रकार करणाऱ्या बिगर बॅंकिंग वित्तसंस्थांवर (एनबीएफसी) रिझर्व्ह बॅंकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
  • बॅंकेने 31 “एनबीएफसी’ची नोंदणी रद्द केली असून यातील सर्वाधिक 27 कंपन्या पश्‍चिम बंगालमधील आहेत. देशभरात जवळपास 12 हजार एनबीएफसी कंपन्या आहेत. विविध योजनांमधून या कंपन्या ग्राहकांकडून ठेवी स्वीकारतात; मात्र गेल्या काही वर्षांत गुंतवणूक योजनांमधून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.
  • नुकतीच रिझर्व्ह बॅंकेने 31 कंपन्यांची नोंदणी रद्द केली. यातील 27 कंपन्या पश्‍चिम बंगाल आणि चार कंपन्या उत्तर प्रदेशातील आहेत. “आयएल अँड एफएस’ या सरकारी कंपनीच्या आर्थिक संकटानंतर एनबीएफसी क्षेत्रात रोकडटंचाई तीव्र झाली आहे. या छोट्या कंपन्यांना पतपुरवठा वाढवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून प्रयत्न केले जात आहेत.

Related Articles

Check Also
Close
Back to top button