प्रतिष्ठेच्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताव घोष यांची निवड
- साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना या पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे.
- प्रसिद्ध कादंबरीकार प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ज्ञानपीठ निवड समितीच्या बैठकीत शुक्रवारी अमिताव घोष यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
- द शॅडो लाईन्स, द ग्लास पॅलेस, द हंग्री टाइड या त्यांच्या गाजलेल्या कांदबऱ्या आहेत.
- अमिताव यांचा कोलकातामध्ये १९५६ साली एका बंगाली-हिंदू कुटुंबात जन्म झाला. सध्या अमिताव न्यूयॉर्क येथे आपल्या पत्नीसोबत राहतात. दिल्ली आणि अन्य परदेशी नामांकित विद्यापीठामधून त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये काहीवर्ष वास्तव्य केले.
- याआधी पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत
- राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले ६७ वर्षीय अशोक गेहलोत यांच्याकडेच राज्याचे नेतृत्व सोपविताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करून समजूत काढली. पायलट यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदही कायम राहणार आहे.
जागतिक चहा दिन
- आज जागतीक चहा दिन…. पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं..
- चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते… जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय
आयर्लंड संसदेकडून गर्भपाताची परवानगी
- आयर्लंडच्या संसदेने ऐतिहासिक निर्णय घेत प्रथमच गर्भपाताचा कायदा मंजूर केला. वर्ष 2018 च्या सुरूवातीला झालेल्या जनमत संग्रहानंतर आयर्लंडच्या संसदेने पहिल्यांदाच गर्भपाताची परवानगी दिली. हा देशासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी सांगितले.
- वर्ष 2012 मध्ये वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी भारतीय दंतवैद्य सविता हलप्पनवार या महिलेचा आयर्लंडमध्ये मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी गर्भपाताची परवानगी नाकारल्यानंतर रक्तातील विषबाधेने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आणि मोठं आंदोलन येथे करण्यात आले होते.
- नवीन कायद्यानुसार आता 12 आठवड्यांचा गर्भ असेल व गर्भवती महिलेच्या जीवास धोका असेल, तर तो पाडता येईल. गर्भात विकृती असतील व त्यातून गर्भच मरणार असेल, तर 28 दिवस आधी किंवा नंतर गर्भपात करता येईल. गर्भपातावर असलेली घटनात्मक बंदी उठवण्यासाठी झालेल्या सार्वमतात मे महिन्यात 66 टक्के लोकांनी बंदी उठवण्याच्या बाजूने मतदान केले होते.
- 1980 पासून आतापर्यंत एकूण 1 लाख 70 हजार महिलांनी या बंदीमुळे शेजारच्या ब्रिटनमध्ये जाऊन गर्भपात करून घेतला आहे. आयर्लंड हा कॅथॉलिक देश असून तेथे चर्चचा प्रभाव कमी होत चालला आहे. आता माल्टा हा युरोपीय समुदायातील एकच देश असा उरला आहे, की जेथे गर्भपातावर पूर्ण बंदी आहे.
शंभर रुपयाच्या नाण्यावर, माजी पंतप्रधानांचा फोटो
- सरकार नवीन नाणे घेऊन येत आहे, त्याची तयारी सध्या सुरू आहे. हे नाणे शंभर रुपयांचे आहे आणि त्यावर माजी पंतप्रधान अटलबिहारी यांचा फोटो लावण्यात आला आहे. माजी पंतप्रधान यांच्या ९५वी जयंती निमित्ताने भारत सरकार हे नाणे घेऊन येणार आहे, याची घोषणा
- अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ मध्ये ग्वाल्हेर येथे झाला. अटलबिहारी यांचा जन्मदिवस आणखी खास बनवण्यासाठी सरकार तयारीत आहे.
- नाण्याच्या एका बाजूस माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे स्मारक आणि देवनागरी तसेच इंग्रजी भाषेत त्यांचं नाव लिहिलं जाणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूस अशोक स्तंभ आहे. नाण्यातील फोटोच्या खालील भागात वाजपेयी यांचे जन्मवर्ष १९२४ आणि मृत्यू २०१८ दर्शविण्यात आला आहे. या नाण्याचं वजन ३५ ग्रॅम असेल. नाण्याच्या उजव्या बाजूस ‘भारत’ हे देवनागिरीत. तर डाव्या बाजूस इंग्रजीमध्ये लिहिलं जाणार आहे.