⁠
Uncategorized

Current Affair 26 January 2019

प्रणब मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न

  • माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी तसेच दिवंगत समाजसेवक नानाजी देशमुख आणि दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांना शुक्रवारी ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला.
  • हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे जन्मलेले नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले ज्येष्ठ नेते होते. जनसंघाचे नेते असलेले नानाजी हे राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  • चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते. २०१०मध्ये वयाच्या ९५व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.
  • चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने तसेच पद्म किताबानेही त्यांचा गौरव झाला होता. ‘इप्टा’पासून कलाजीवनाचा प्रारंभ केलेले हजारिका अनेक सामाजिक आंदोलनातही सहभागी होते. २०११साली वयाच्या ८५व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले होते.
  • भूपेन हजारिका यांनी आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून विपुल कार्य केले. आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते.

बाबासाहेब पुरंदरे, वामन केंद्रे, तीजनबाई, डॉ. कुकडे,
डॉ. कोल्हे यांना ‘पद्म’

  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते मनोज बाजपेयी, मोहनलाल, समाजसेवक डॉ. अशोक कुकडे, डॉ. स्मिता आणि रवींद्र कोल्हे, तीजनबाई, पत्रकार कुलदीप नय्यर आदी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववंतांना ‘पद्म’ किताब जाहीर झाला आहे.
  • पद्मविभूषण किताबाने चौघांना गौरविले जाणार आहे. यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ‘एल अ‍ॅण्ड टी’ समूहाचे अध्यक्ष अनिल नाईक, पांडवनी शैलीतील पहिली लोकगायिका तीजनबाई आणि युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन राहत’ या मोहिमेला बळ देणारे तेथील नेते इस्माईल ओमर गुलेह यांचा समावेश आहे.
  • पद्मभूषण किताबाने १८ जणांचा गौरव केला जाणार आहे. पद्मश्री किताबानेही विविध क्षेत्रांतील ९० गुणवंतांचा गौरव होणार आहे.

लष्करप्रमुखांसह १९ जणांना ‘पीव्हीएसएम’ सन्मान

  • लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह १९ लष्करी अधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा मेडलने (पीव्हीएसएम) सन्मानित करण्यात आले. लष्करातील अधिकाऱ्यांसाठीची ही शांततेच्या काळातील सर्वोच्च सेवा पदके आहेत. ‘पीव्हीएसएम’ने गौरविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांत १५ लेफ्टनंट जनरल आणि तीन मेजर जनरल यांचा समावेश आहे.
  • शांततेच्या काळातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शौर्य पदक कीर्ती चक्र जाट रेजिमेंटचे मेजर तुषार गौबा आणि २२ राष्ट्रीय रायफल्सचे सोवर (सांडणीस्वार) विजय कुमार (मरणोत्तर) यांना जाहीर करण्यात आले आहे.
  • तिसऱ्या क्रमांकाचे शौर्य पदक शौर्य चक्र नऊ जणांना देण्यात आले आहे. मेज तुषार गौबा यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात कुपवाडा जिल्ह्यात ताबा रेषेवर लढताना अतुलनीय शौर्य दाखविले होते. सोवर विजय कुमार यांना २-३ ऑगस्टला बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते.
  • तीन लेफ्टनंट जनरलना उत्तम युद्ध सेवा मेडलने गौरविण्यात आले असून, ३२ अधिकाऱ्यांना अति विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. नऊ जणांना युद्ध सेवा मेडल जाहीर करण्यात आले आहे.
  • याखेरीज लष्कराच्या १०३ जवानांना सेना मेडल, ७४ अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवा मेडल, ३५ अधिकाऱ्यांना सेना पदक जाहीर झाले आहे.

गौतम गंभीर, मनोज वाजपेयी, प्रभूदेवा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. ९४ जणांना पद्मश्री, १४ जणांना पद्मभूषण आणि चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
  • पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी – इस्त्रोचे शास्त्रज्ञ नांबी नारायण, माजी लोकसभा उपाध्यक्ष कारीया मुंडा, अभिनेते मोहन लाल, भारतीय गिर्यारोहक बच्छेंद्री पाल, खासगा हुकमदेव नारायण यादव, पत्रकार कुलदीप नय्यर यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • पद्मश्री पुरस्काराचे मानकरी – दिवंगत अभिनेते कादर खान, अभिनेते मनोज वाजपेयी, फुटबॉलपटू सुनील छेत्री, दिग्दर्शक प्रभू देवा, क्रिकेटपटू गौतम गंभीर, गायक शंकर महादेवन आणि बजरंग पुनिया एकूण ९४ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

Related Articles

Back to top button