⁠
Uncategorized

चालू घडामोडी : ०२ ऑगस्ट २०२०

Current Affairs 02 August 2020

ऐहितासिक : अमेरिकेच्या जीडीपीमध्ये ३३ टक्के घसरण

Pakistan's GDP Growth Rate to Remain Lowest in Region till 2020 ...
  • करोना काळात आर्थिक फटका जगातील सर्वच अर्थव्यवस्थांना बसत आहे. याला अपवाद अमेरिकेचा देखील नाही. एप्रिल ते जून या तिमाहीत अमेरिकेच्या जीडीपीमध्ये ३३ टक्के इतकी घसरण झाली आहे. ही एक ऐहितासिक घसरण असून आजवरचा घसरणीचा हा विक्रम ठरला आहे.
  • गेल्या तीन महिन्यात अमेरिेकतील बेरोजगारी १४.७ टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकेतील आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे असते. गुरुवारी एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी जाहीर करण्यात आले.
  • अमेरिकेत १९४७ पासून जीडीपीचे आकडेवारी प्रसिद्ध केले जात आहेत. १९५८ साली अर्थव्यवस्थेत १० टक्के इतकी घसरण झाली होती. जी सध्याच्या परिस्थितीपेक्षा दुसऱ्या क्रमांकाची मोठी घसरण मानली जाते. या वर्षी जानेवारी- मार्च या तिमाहीत अर्थव्यवस्था ५ टक्क्यांनी घसरली होती.

भारताचा “ग्रीन-अॅग” प्रकल्प

  • कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-अॅग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे.
  • ठळक बाबी
  • हा मिश्र भूमीपयोगी प्रणालींसह पाच प्रकारच्या भूमीवर कमीतकमी 1.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बहुविध जागतिक पर्यावरणविषयक लाभ मिळविण्यासाठी तयार केलेला प्रकल्प आहे.
  • कमीतकमी 1,04,070 हेक्टर भूमी शाश्वत शेतजमीन आणि जलव्यवस्थापनाच्या अंतर्गत आणणे हे या कार्यक्रमामागचे उद्दीष्ट आहे.
  • शाश्वत पद्धतींच्यामार्फत जवळपास 49 दशलक्ष कार्बन डायऑक्साईड वायूचे वातावरणात उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.
  • हा प्रकल्प प्रारंभी मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, मिझोरम आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. पुढे संपूर्ण भारतात यांची अंमलबजावणी होणार.

माजी कर्णधार इयानचा हाऊस ऑफ लॉर्ड्‌्समध्ये समावेश

  • इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बॉथमचे नाव हाऊस ऑफ लॉर्ड्‌्समध्ये समाविष्ट झाले. ब्रिटेन सरकारने त्याला लाइफ पीरेज पुरस्कार देण्याची घोषणा केली. बॉथाचा त्या ३६ लोकांमध्ये समावेश झाला, ज्यांना हा पुरस्कार मिळाला. २०११ नंतर हा पुरस्कार मिळवणारा बॉथम पहिला क्रिकेटपटू बनला.

वाघ नागझिरात घटले, ताडोबात वाढले!

चार वर्षात पाचशे वाघ वाढले- Maharashtra Times
  • निसर्गवन, जैवविविधता आणि पाणी हे जंगलाचे वैभव असते. त्याशिवाय प्राणी स्थिरावत नाही. नैसर्गिक अन्नसाखळी मजबूत होत नाही. वाघांसारख्या प्राण्यांसाठी बांबूवन आणि गवताळ प्रदेशाचीही गरज असते.
  • मात्र, अलिकडे वन विकास महामंडळाकडून (एफडीसीम) जंगलात सागांचे एकसुरी रोपण होत असल्याने वाघ टिकत नाहीत. असा अनुभव नागझिरा आणि ताडोबाच्या जंगलाच्या तुलनात्मक अभ्यासातून पुढे आला आहे.
  • सुमारे ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८० च्या सुमारास नागझिराच्या जंगलात ६ ते ८ वाघ होते. एवढेच वाघ ताडोबाच्याही जंगलात होते. मात्र, या काळामध्ये ताडोबातील वाघ वाढून आता १०० वर पोहोचले, परंतु नागझिरामध्ये असलेल्या वाघांची संख्या ६ ते १० च्या वर गेलेली नाही.
  • ताडोबाचे जंगल वाघांसाठी नेहमीच आदर्श राहिले आहे. गवताळ प्रदेश, बांबू, निसर्गवन हे वातावरण तिथे पोषक आहे.
  • प्रत्यक्षात ताडोबाचे क्षेत्रफळ फारच कमी म्हणजे ११६ चौरस किलेमीटर आहे. यानुसार येथे १२ ते १८ वाघ सामावण्याची क्षमता असली तरी अंधारी प्रकल्पामुळे ती वाढली. यासोबतच अनेक बफर या वनाशी जोडले गेले. त्यामुळे वाघांचा सुरक्षित अधिवास वाढला.

दंगल गर्ल बबिता क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी

babitadeputy7 202008466694
  • दंगल गर्ल बबिता आणि कबड्डीपटू कविता देवी यांची हरयाणा सरकारनं क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी नियुक्ती केली आहे.
  • 2009 आणि 2011च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णकमाई करणाऱ्या बबितावर हरयाणा सरकारनं मोठी जबाबदारी टाकली आहे.
  • 2018मध्ये बबितानं या पदासाठी अर्ज केला होता. बबिता हरयाणा पोलिसात सब इन्स्पेक्टर होती, परंतु राजकारणात प्रवेश करण्यासाठी तिनं नोकरी सोडली.

दिल्लीत नायट्रोजन डायऑक्साइड वायूच्या पातळीत 70 टक्क्यांची घट झाली

कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात हवेच्या प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट दिसून आली आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे.
या काळात राजधानी नवी दिल्लीमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) वायूच्या पातळीत 70 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, असे समजले. तसेच जागतिक पातळीवर बेल्जियम देशामध्ये NO2 ची पातळी 40 टक्क्यांनी खाली घसरली तर अमेरिका देशात हे प्रमाण 20 टक्क्यांचे आहे.

Related Articles

Back to top button