Current Affairs 02 March 2020
सहकारी बँकांवर रिझव्र्ह बँकेचे नियंत्रण वाढविण्यासाठी विधेयक
सहकारी बँकांना रिझव्र्ह बँकेच्या कडक र्निबधांखाली आणण्याबाबतचे विधेयक संसदेच्या या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. बँकिंग नियमन कायद्यानुसार या बँकांना नियम लागू केले जाणार आहेत.
या विधेयकामुळे पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेसारखे पेच निर्माण होणार नाहीत. देशात १५४० सहकारी बँका असून त्यांचे ठेवीदार ८.६० कोटी आहेत. त्यांच्या ठेवी एकूण ५ लाख कोटींच्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती, त्यात बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली असून सहकारी बँकांना रिझव्र्ह बँकेच्या र्निबधानुसार काम करावे लागणार आहे.
लेफ्टनंट जनरलपदी डॉ. माधुरी कानिटकर
लष्करात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळण्यासाठीची एक मोठी लढाई महिलांनी सर्वोच्च न्यायालयात नुकतीच जिंकली असताना मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांना लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली.
कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड गेल्या वर्षीच झाली होती, पण जागा रिक्त झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. या उच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्याच मराठी महिला अधिकारी आहेत.
नवी दिल्ली येथे त्यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत आहे. लष्करात या श्रेणीचे पद मिळवणाऱ्या कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी असून त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. कानिटकर यांचे पती राजीव लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते नुकतेच निवृत्त झाले. पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे.
डॉ. कानिटकर यांनी लष्करात ३७ वर्षे सेवा केली आहे. सीडीएस-वैद्यकीय पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही सेवांबाबत (हवाई दल, नौदल आणि स्थलसेना) केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम त्या करतील.
मलेशियाच्या पंतप्रधानपदी मुहियिद्दीन यासीन
मलेशियात महाथीर मोहम्मद यांचा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पराभव झाला असून, फारसे परिचित नसलेले अंतर्गत मंत्री मुहियिद्दीन यासीन हे नवे पंतप्रधान झाले आहेत.
यासीन यांच्या आश्चर्यकारक विजयामुळे केवळ जगातील सर्वात वृद्ध पंतप्रधान असलेले ९४ वर्षांचे महाथीर हेच बाजूला झाले आहेत असे नसून, अन्वर इब्राहिम यांचीही अलीकडच्या काळात देशाचे नेते होण्याचे स्वप्न भंगले आहे.
‘मुंबई-श्री’शरीरसौष्ठव स्पर्धा : रसेल दिब्रिटो ‘मुंबई-श्री’
विरारच्या रसेल दिब्रिटो याने अवघ्या नऊ महिन्यांच्या तपश्चर्येनंतर ‘मुंबई-श्री’ या प्रतिष्ठेच्या किताबाला गवसणी घातली आहे. बॉडी वर्कशॉपच्या रसेलने विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या सुशील मुरकर आणि नीलेश दगडे यांचे आव्हान मोडून काढत ‘मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरले.
अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबवर भव्यदिव्य झालेल्या या स्पर्धेत फॉच्र्युन फिटनेसच्या रेणुका मुदलियार हिने महिलांच्या फिटनेस फिजिक प्रकारात ‘मिस-मुंबई’चा मान पटकावला. तर अमला ब्रह्मचारी हिने आपल्या पिळदार शरीरयष्टीने बाजी मारली. पुरुषांच्या फिजिक स्पोर्ट्स प्रकारात अरमान अन्सारी आणि आतिक खान विजेते ठरले.
भारताचे माजी हाॅकीपटू बलबीर सिंह यांचे निधन
भारताचे माजी हाॅकीपटू बलबीर सिंह यांचे निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते.
हाॅकी इंडियाने ट्विट करताना माजी हाॅकीपटू आणि दोनवेळच्या आॅलिम्पिक पदक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेल्या बलबीर सिंह खुल्लर यांच्या निधनाबदल दु:ख व्यक्त केले
पंजाबमधील जालंधर जिल्हातील संसारपूर गावात जन्म झालेल्या बलबीर यांनी १९६३ साली फ्रान्सच्या लियोनमध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी बेल्जियम, इंग्लंड, नेदरलॅण्ड आणि पश्चिम जर्मनी अशा देशाचा दौरा करताना भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. बलवीर १९६६ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि १९६८ मध्ये मैक्सिकोमध्ये झालेल्या आॅलिम्प्कमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते
DDFtennis : जोकोविचचने पटकावले दुबई टेनिस अंजिक्यपद स्पर्धेचे विजेतेपद
सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने दुबई टेनिस अंजिक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेचेया पुरूष एकेरीमध्ये अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचने ग्रीसच्या स्टेफानोस सिसिपासचा ६-३, ६-४ असा पराभव करत विजय नोंदविला.
जोकोवीचने पाचव्यांदा दुबई टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. तसेच त्याच्या कारकिर्दीतील हे ७९ वे विजेतेपद ठरले.
दरम्यान, याआधी जोकोविचने उपांत्य फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या गेल माँफिलिसचा २-६,७-६ (१०-८), ६-१ असा पराभव करत अतिंम फेरीत धडक मारली होती. तर, उपांत्यपूर्व फेरीत त्याने कारेन काचनोव याचा ६-२, ६-२ असा पराभव करत आगेकूच केली होती.
द्युती चंदला सुवर्णपदक
भारताची सर्वाधिक वेगवान महिला धावपटू द्युती चंदने शनिवारी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याशिवाय नरेंद्र प्रतापसिंगने स्पर्धेतील दुसऱ्या सुवर्णपदकावर नाव कोरले.
कलिंगा औद्योगिक तंत्रज्ञान संस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २४ वर्षीय द्युतीने ११.४९ सेकंदांत विजयी अंतर गाठले. मँगलोर विद्यापीठाची धनलक्ष्मी एस. आणि महात्मा गांधी विद्यापीठाची स्नेहा यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी द्युती २०० मी. धावण्याच्या शर्यतीतसुद्धा सहभागी होणार आहे.
पुरुषांच्या ५,००० मी. धावण्याच्या शर्यतीत मँगलोर विद्यापीठाच्या नरेंद्रने (१४.१८.१९ मिनिटे) अव्वल क्रमांक मिळवला. मँगलोर विद्यापीठाच्याच आदिशने दुसरे स्थान मिळवले. नरेंद्रने दोन दिवसांपूर्वीच १० हजार मी. प्रकारातसुद्धा सुवर्णपदक मिळवले होते.
.