⁠  ⁠

चालू घडामोडी : ०३ ऑगस्ट २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 03 August 2020

‘स्पेस एक्स’ची कुपी अवकाशवीरांसह माघारी

स्पेस एक्स (Space X) क्या है? - Quora
  • अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत येत आहे.
  • खासगी कंपनीच्या माध्यमातून नासाने अवकाशवीर पाठवणे व त्यांचे परत पृथ्वीवर येणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच घडत असून ही अवकाश कुपी पृथ्वीवर सुरक्षित उतरवण्यासाठी स्पेस एक्स कंपनी मार्गदर्शन करीत आहे.
  • मेक्सिकोच्या आखातात रविवारी दुपारी ही कुपी अवतरण करणार असून दोन महिन्यांच्या अवकाश वास्तव्यानंतर ती परत येत आहे.
  • ही कुपी उतरवण्यासाठी मेक्सिको आखाताची निवड करण्यात आली आहे, कारण फ्लोरिडातील किनाऱ्यावर एक उष्णकटीबंधीय वादळ आहे.
  • अवकाश वैमानिक डग हर्ले व बॉब हेनकेन हे दोन अमेरिकी अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात स्पेस एक्सच्या ड्रॅगन अवकाशकुपीतून गेले होते.
  • यापूर्वी २४ जुलै १९७५ रोजी नासाचे अवकाशवीर पॅसिफिकच्या महासागरात उतरले होते.
  • ड्रॅगन अवकाशकुपीला आता एंडेव्हर नाव देण्यात आले असून तिचा वेग पृथ्वीकडे येताना ताशी २८ हजार कि.मी असेल. तो वातावरणात येईपर्यंत ताशी ५६० कि.मी पर्यंत खाली आणावा लागेल.
  • त्यानंतर ही कुपी सागरात पडताना तिचा वेग ताशी २४ कि.मी राहील. परत येताना अवकाशकुपीचे तापमान १९०० अंश सेल्सियस राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वात प्रदीर्घकाळ असलेले पंतप्रधान

Second Modi ministry - Wikipedia
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. भाजपाचे सर्वात प्रदीर्घकाळ असलेले पंतप्रधान म्हणून पंतप्रधान मोदींनी विक्रम केला आहे.
  • त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. तसेच, सर्वात जास्त काळापर्यंत पंतप्रधान पदावर असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणून देखील पंतप्रधान मोदी यांनी विक्रम केला आहे.
  • पंतप्रधान मोदी यांच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी हे सर्वात प्रदीर्घकाळ गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. तर, सलग २ हजार २५६ दिवस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावर होते. १९ मार्च १९९८ रोजी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले होते. जे सलग २२ मे २००४ पर्यंत पंतप्रधान पदावर होते. त्यांचा पहिला कार्यकाळ १९ मार्च १९९८ ते १३ ऑक्टोबर १९९९ पर्यंत होता. तर दुसरा कार्यकाळ १३ ऑक्टोबर ते २२ मे २००४ पर्यंत होता.
  • तर, सद्यस्थितीस देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असलेले नरेंद्र मोदी हे २ हजार २६० दिवसांपासून आजतागायत पंतप्रधान पदावर कायम आहेत. यामुळे सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावर राहिलले पहिले गैरकाँग्रेसी व भाजपा नेता म्हणून त्यांच्या नावे विक्रम झाला आहे.
  • नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ २६ मे २०१४ पासून सुरू झाला असून, तो अद्यापही सुरूच आहे. २०१४ मध्ये भाजपा प्रचंड बहुमत मिळवत देशात सत्तेत आली होती. त्यानंतर २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

ब्रिटिश ग्रां. प्रि. फॉम्र्युला वन शर्यत : हॅमिल्टन सातव्यांदा अजिंक्य

spt01
  • अखेरची फेरी पूर्ण करायची असताना कारचा टायर पंक्चर होऊनही मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टन याने ब्रिटिश ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीच्या जेतेपदावर नाव कोरले. त्याचे हे कारकिर्दीतील ८७वे तर ब्रिटिश ग्रां. प्रि.चे सातवे विजेतेपद ठरले.
  • ५२ फे ऱ्यांच्या (लॅप) या शर्यतीत हॅमिल्टन आणि त्याचा सहकारी वाल्टेरी बोट्टास आघाडीवर होते. पण ५०व्या लॅपदरम्यान बोट्टासच्या कारचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरून त्याची थेट ११व्या स्थानी घसरण झाली.
  • अर्धा लॅप शिल्लक असताना हॅमिल्टनच्या कारचाही टायर पंक्चर झाला. पण रेड बुलच्या मॅक्स वेस्र्टापेनला अवघ्या सहा सेकं दांनी मागे टाकत हॅमिल्टनने बाजी मारली. या विजेतेपदासह जगज्जेतेपदाच्या शर्यतीत ८८ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. बोट्टास ५८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
  • फे रारीचा चार्ल्स लेकलेर्क तिसरा तर रेनॉचा डॅनियल रिकार्डियो चौथा आला. मॅकलॅरेनच्या लँडो नॉरिसने पाचवे स्थान पटकावले.

एफए चषक फुटबॉल स्पर्धा : आर्सेनलला जेतेपद

spt03
  • सुरुवातीलाच पिछाडीवर पडल्यानंतर जोमाने मुसंडी मारत आर्सेनलने चेल्सीचा २-१ असा पराभव करून १४व्यांदा एफए चषक फु टबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. पाएरे-एमेरिक ऑबामेयांगचे दोन गोल आर्सेनलच्या विजयात निर्णायक ठरले.
  • चेल्सीने बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा के ली; पण ७३व्या मिनिटाला त्यांच्या मटेओ कोव्हाकिक याला दुसरे पिवळे कार्ड दाखवल्यामुळे मैदानाबाहेर जावे लागले. त्यामुळे बरोबरी साधण्याच्या चेल्सीच्या प्रयत्नांना सुरुंग बसला.
  • या विजयासह आर्सेनलने पुढील वर्षीच्या ‘यूएफा’ युरोपा लीगमधील आपले स्थान निश्चित केले. जानेवारी महिन्यात आर्सेनलच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या मिके ल अर्टेटा यांचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.

Share This Article