⁠  ⁠

चालू घडामोडी : ०३ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 01 February 2020

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडला १७ वर्षांपूर्वीचा विक्रम!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर एकीकडे विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे हा अर्थसंकल्प काही वेगळ्या कारणांमुळे विशेष देखील ठरला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज या अर्थसंकल्पाद्वारे १७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेच्यानुसार सर्वात प्रदीर्घ असे भाषण केले आहे. त्यांचे भाषण २ तास ४० मिनिटं चालले. या अगोदर माजी अर्थमंत्री जसवंतसिंह यांच्या नावावर सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम आहे. त्यांनी २ तास १३ मिनिटं भाषण केले होते. त्यांच्या खालोखाल दिवगंत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा क्रमांक येतो. त्यांनी २ तास १० मिनिटं भाषण केले होते. तर, २०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांनी २ तास ५ मिनिटं भाषण केलेलं आहे.
याशिवाय निर्मला सीतारामन या दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री देखील ठरल्या आहेत. या अगोदर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील दोनवेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मात्र, तेव्हा त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाशिवाय अन्य खात्यांची देखील अतिरिक्त जबाबदारी होती.

टेनिस : अंकिता रैनाचा डबल धमाका; महिला एकेरीमध्येही जिंकले विजेतेपद

image 1

भारताची नंबर वन टेनिसपटू अंकिता रैनाने रविवारी थायलंड येथील स्पर्धेत किताबाचा डबल धमाका उडवला. तिने महिला दुहेरीपाठाेपाठ एकेरीचेही विजेेतेपद पटकावले. तिसऱ्या मानांकित अंकिताने महिला एकेरीच्या फायनलमध्येे चाैथ्या मानांकित काेल पेक्वेटला पराभूत केले. तिने ६-३, ७-५ अशा फरकाने सामना जिंकला.

टेबल टेनिस : हरमितने जिंकला पहिला एकेरीचा किताब; सुत्रिथाला दाेन जेतेपदे

image

टेबल टेनिसपटू हरमित देसाईने पहिल्यांदा पुरुष एकेरीचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. त्याने फायनलमध्ये मानव ठक्करचा ४-३ ने पराभव केला. यासह ताे किताबाचा मानकरी ठरला. दुसरीकडे सुत्रिथाने महिला एकेरी अाणि दुुहेरीमध्ये चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. यासह तिने दाेन विजेतेपद जिंकले अाहेत.

budget 2020 : बाजारमूल्य जीडीपी वाढीचा दर १० टक्के राहणार

gdp साठी इमेज परिणाम"

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये वर्तमान मूल्यावर जीडीपी वाढीचा दर १० टक्के राहण्याची शक्यता वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना व्यक्त केली.
नवीन वित्तीय वर्षात एकूण मिळकत २२.४६ लाख कोटी आणि एकूण खर्च ३०.४२ कोटी राहण्याची शक्यता आहे. त्या म्हणाल्या, चालू वित्तीय वर्ष २०१९-२० मध्ये संशोधित अंदाजे खर्च २६.९९ लाख कोटी रुपये आणि मिळकत १९.३२ लाख कोटी रुपये आहे. वित्तीय वर्ष २०१९-२० मध्ये शुद्ध बाजार उधारी ४.९९ लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे.
आयात इलेक्ट्रिक वाहने महागणार
विजेवर चालणारी (इलेक्ट्रिक) आयाती वाहने महागणार आहेत. देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील सीमाशुल्क वाढविण्याचा प्रस्ताव आहे.‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांच्या सुट्याभागावर सीमाशुल्क आकारले जाणार आहे.
इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईलच्या सुट्याभागांवरील सीमाशुल्कांचे सुधारित दर लागू केले जातील. व्यापारी उद्देशासाठी वापरल्या जाणाºया पूर्ण इलेक्ट्रिक वाहनांवरील सीमाशुल्क २५ वरून ४० टक्के केला जाणार आहे. अर्धइलेक्ट्रिक वाहनांवरील सीमाशुल्काचे दर १५ टक्क्यांवरून ३० टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. इलेक्ट्रिक बस, ट्रक आणि दुचाकी वाहनांवरील सीमाशुल्क १५ वरून २५ टक्के करण्यात आले आहे. नवी दरवाढ १ एप्रिलपासून लागू केली जाईल.

Share This Article