भारतात वायुप्रदूषणाने वर्षांत १२ लाख मृत्यू
- भारतामध्ये वायुप्रदूषणामुळे २०१७ मध्ये १२ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती वायुप्रदूषणावरील जागतिक अहवालात देण्यात आली आहे.
- ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०१७’च्या अहवालानुसार, जगभरात २०१७ मध्ये बंदिस्त जागेतील तसेच खुल्या वातावरणातील वायुप्रदूषणाशी दीर्घकाळ संबंध आल्याने पक्षाघात, मधुमेह, हृदयविकार, फुप्फुसाचा कर्करोग होऊन जवळपास ५० लाख लोकांचा मृत्यू ओढवला. यापैकी ३० लाख लोकांचे मृत्यू हे हवेतील प्रदूषणकारी कणांशी (पीएम२.५) थेट निगडित आहेत.
- यापैकी जवळपास निम्मे मृत्यू हे भारत आणि चीन या देशांमधील आहेत. २०१७ मध्ये या दोन्ही देशांत वायुप्रदूषणामुळे १२ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात वायुप्रदूषणामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू हे या दोन देशांत झाले आहेत, असा निष्कर्ष या अहवालात नोंदविण्यात आला आहे.
- अमेरिकास्थित ‘हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिटय़ूट’ (एचईआय) या संस्थेतर्फे बुधवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
सागरी सुरक्षेला ‘सीहॉक’चे बळ
- अमेरिकेने भारताला २४ बहुउद्देशीय एमएच-६०आर सीहॉक सागरी हेलिकॉप्टर पुरवण्यास मान्यता दिली आहे. या हेलिकॉप्टरची एकत्रित अंदाजे किंमत २.६ अब्ज डॉलर इतकी असेल. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ही माहिती दिली.
- भारताच्या सागरी सुरक्षेला त्यामुळे बळकटी मिळणार असून पाण्यावरील युद्ध आणि पाणबुडीविरोधी युद्धासाठी याचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. हिंदी महासागर विभागात चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शहदेखील त्यामुळे देता येणार आहे.
- समुद्रामधील शोधमोहीम, नैसर्गिक संकट काळातील मोहिमा, शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध, युद्धनौकांना नष्ट करणे आदी बाबींमध्ये हे हेलिकॉप्टर उपयोगी ठरते. लॉकहीड मार्टिन कंपनीने हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. भारताच्या ताफ्यातील ब्रिटिशांची ‘सी-किंग’ हेलिकॉप्टरची जागा ही हेलिकॉप्टर घेतील.
‘बेनेट’ची मूट कोर्ट स्पर्धा
- प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजाची माहिती कायद्याच्या विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी बेनेट विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉ यांच्यातर्फे प्रथमच ‘बेनेट युनिव्हर्सिटी नॅशनल मूट कोर्ट स्पर्धा २०१९’चे आयोजन करण्यात आले होते.
- ग्रेटर नोएडा कॅम्पसमध्ये २९ ते ३१ मार्च या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत बेंगळुरूच्या ख्राइस्ट विद्यापीठाने बाजी मारली, तर दिल्लीच्या विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीजने दुसरा क्रमांक पटकावला.
- ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कायदा आणि तंत्रज्ञान यांवर आधारित ठरली
भारतीय खेळाडू लवकरच WWE मध्ये
- द ग्रेट खलीला जगातील सर्वात उंच रेसलर आव्हान देत आहे. हा रेसलर भारतीय असून त्याचे नाव सुनील कुमार आहे.
- त्यापाठोपाठ आता भारतातून नवीन रेसलर सुनील कुमार WWE मध्ये भाग घेणार आहे.
- त्यानंतर त्याने WWE च्या पात्रता फेरित धडक मारली. WWE मूळे आता संपूर्ण जगात सनील कुमारची चर्चा होऊ लागली आहे. त्यामूळे आता लवकरच द ग्रेट अंगार WWE रिंगमध्ये अमेरिकन फायटर्सची धुलाई करताना दिसेल.
महाराष्ट्रातील पावणेदोन लाख जलस्त्रोत दूषित
- घरगुती सांडपाणी एकाच ठिकाणी केंद्रीत होत असल्याने राज्यातील जलस्त्रोत दुषित होण्याचा धोका वाढला आहे. सुमारे ७५ ते ८० टक्के जलस्त्रोत याच कारणामुळे दुषित झाले आहेत.
- केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यकमांतर्गत देशभरातील सर्वच राज्यात जलस्त्रोतांची तपासणी करण्यात आली. यात महाराष्ट्रातील १ लाख ७१ हजार ४८४ जलस्त्रोत दुषित आढळले आहेत.
- देशभरातील एकूण १ कोटी ४५ लाख ४० हजार ९०० जलस्त्रोतांपैकी ९१ लाख १ हजार १९२ जलस्त्रोतांची तपासणी करण्यात आली. यातील २१ लाख २३ हजार ९४८ जलस्त्रोतांमध्ये रसायनांचे तर ११ लाख सात हजार १३ जलस्त्रोमांमध्ये जीवाणूंचे प्रमाण अधिक आढळून आले.
विकासदर ७.२ टक्के राहणार – एडीबी
- एकंदर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराबाबत अर्थतज्ज्ञांकडून उघडपणे सांशकता व्यक्त केली जात असताना, भक्कम क्रयशक्तीच्या जोरावर भारताला चालू वित्त वर्षांत ७.२ टक्के विकासदर गाठता येईल, असा कयास आशियाई विकास बँक अर्थात ‘एडीबी’ने व्यक्त केला आहे.
- रिझव्र्ह बँकेची व्याजदर कपात, शेतकऱ्यांना मिळणारे किमान उत्पन्न, देशांतर्गत वस्तूकरिता असलेली मागणी आदींमुळे २०१९ मध्ये भारताचा विकास दर ७.२ टक्के, तर २०२० मध्ये तो ७.३ टक्के असेल, असे ‘एडीबी’ने म्हटले आहे.