---Advertisement---

चालू घडामोडी : ०४ फेब्रुवारी २०२२

By Rajat Bhole

Updated On:

---Advertisement---

Current Affairs : 04 February 2022

लॉरेओ पुरस्कारासाठी नीरजला नामांकन ; क्रीडाविश्वातील ‘ऑस्कर’साठी मिळालं नामांकन!

Neeraj Chopra back in training at national camp in Patiala

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला बुधवारी प्रतिष्ठेच्या लॉरेओ ‘जागतिक लक्षवेधी कामगिरी’ पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे. अशी कामगिरी करणारा नीरज ठरला तिसरा भारतीय
या विभागात नामांकन मिळालेला नीरज हा पहिलाच भारतीय क्रीडापटू ठरला.

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला होता. त्याने भालाफेकीच्या अंतिम फेरीत ८७.५८ मीटर अंतराची नोंद करत भारताला ऑलिम्पिकच्या अॅथलेटिक्स स्पर्धातील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले.

‘जागतिक लक्षवेधी कामगिरी’ या पुरस्कारासाठी नीरजसह रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव, ब्रिटनची टेनिसपटू एमा रॅडूकानू, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू प्रेडी, तिहेरी उडीपटू युलिमर रोहास आणि जलतरणपटू अरिअर्ने टिटमस हे खेळाडू शर्यतीत आहेत. विजेत्यांच्या नावांची एप्रिलमध्ये घोषणा करण्यात येईल.

International Wetlands Day अर्थात जागतिक पाणथळ-भूमी दिन

World Wetlands Day 2021: What Are Wetlands, Theme And Significance

१९७१ साली इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावरील रामसर या शहरी ‘पाणथळ प्रदेशांचे महत्त्व’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वाना समजावे या हेतूने दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘वर्ल्ड वेटलँड्स डे’ अर्थात जागतिक पाणथळ-भूमी दिन म्हणून साजरा केला जावा, असा निर्णय या परिषदेत घेतला गेला.

नदी, तलाव, सागरकिनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या आणि गवतांनी व झुडपांनी (खारफुटी) भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्स्यशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो.

ज्या पाणथळ जागेवर एकाच वेळी २० हजारांपेक्षा जास्त पक्षी आढळतात तसेच त्या ठिकाणचे भौगोलिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे स्थान असल्यास, अशा ठिकाणांना ‘रामसर’चा दर्जा प्राप्त होतो. महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याला लवकरच ‘रामसर’चा दर्जा प्राप्त होणार असून, राज्यातील हे पहिले ठिकाण ठरणार आहे!

---Advertisement---

भारत सरकार नॅशनल लँड मोनेटायझेशन कॉर्पोरेशन स्थापन करत आहे

आर्थिक सर्वेक्षणानुसार, जमीन आणि इतर गैर-मुख्य मालमत्तेचे मुद्रीकरण करण्यासाठी सरकार राष्ट्रीय जमीन कमाई निगम (NLMC) ची स्थापना करत आहे.
अर्थसंकल्पातील घोषणेनुसार राष्ट्रीय जमीन मुद्रीकरण महामंडळ (NLMC) ची स्थापना केली जात आहे. भारत सरकारच्या 100 टक्के मालकीची संस्था म्हणून त्याची स्थापना केली जात आहे. प्रारंभिक अधिकृत भाग भांडवल रुपये 5,000 कोटी असेल तर सदस्यता घेतलेले भाग भांडवल रुपये 150 कोटी असेल.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now