⁠
Uncategorized

चालू घडामोडी : ०४ ऑक्टोंबर २०२०

Current Affairs : 04 October 2020

सर्वाधिक लांबीचा अटल बोगद्याचे उद्घाटन

tunnel

पंतप्रधान मोदी यांनी ज्या अटल बोगद्याचे उद्घाटन शनिवारी केले, तो समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा आहे.
मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे ४६ कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी चार ते पाच तासांनी कमी होणार आहे.
हा बोगदा ९.०२ कि.मी.चा असून तो मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडतो.
दक्षिण पोर्टल मनालीपासून २५ कि.मी अंतरावर व ३०६० मीटर उंचीवर आहे. उत्तर पोर्टल हे लाहौल खोऱ्यात सिसू येथील तेलिंग खेडय़ाजवळ ३०७१ मीटर उंचीवर आहे. घोडय़ाच्या नालेसारखा त्यातील मार्गिकांचा आकार असून या प्रकल्पाला ३३०० कोटी रुपये खर्च आला आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मित्र अर्जुन गोपाल यांनी हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीतून बोगदा बांधल्यास सोयीचे होईल, अशी सूचना काही वर्षांपूर्वी केली होती.

‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी

Shaurya missile

भारताने शनिवारी ‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. ओडिशाच्या बालासोर य़ेथे याची चाचणी घेण्यात आली.
शौर्य क्षेपणास्त्राच्या या नव्या आवृत्तीच्या माध्यमातून ८०० किमी दूरवर निशाणा लावला जाऊ शकतो.
यापूर्वी बुधवारी भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. हे क्षेपणास्त्र ४०० किमी पर्यंतच्या अंतरावरील टार्गेट उध्वस्त करु शकतं.
डीआरडीओने ओडिशाच्या बालासोरमध्ये जमिनीवरुन पीजे-१० प्रकल्पांतर्गत या क्षेपणास्त्राची चाचणी केली, या क्षेपणास्त्राला स्वदेशी बूस्टरसोबत लॉन्च करण्यात आले होते.

ICC Women’s T20I Ranking

आयसीसीने महिला क्रिकेट संघांसाठी नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाने आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या खात्यात २९१ तर इंग्लंड महिला संघाच्या खात्यात २८० गुण जमा आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे.
फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा भारतीय महिला संघ २७० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

अभिनेता सोनू सूदला ग्रामोदय बंधु मित्र पुरस्कार

Sonu Sood receives Gramodaya Bandhu Mitra Award | सोनू सूद को ग्रामोदय बंधु  मित्र अवार्ड का मिला सम्मान - दैनिक भास्कर हिंदी

ग्रामोदय चेंबर ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजीने (जीसीओटी) अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) गरीब आणि कमगारांच्या मदतीला पुढे धावून आल्यामुळे बंधु मित्र पुरस्कारने (Gramodaya Bandhu Mitra award)सन्मानित करण्यात आलं आहे.
जीसीओटीच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोनू सूदचा गौरव करण्यात आला.

Related Articles

Back to top button