Current Affairs : 06 February 2022
केरळच्या सरकारला लोकायुक्त नकोसे…

Lokayukta लोकायुक्त
लोकायुक्त हे वॉचडॉगसारखे काम करतात आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यात आणि पारदर्शकता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात
लोकायुक्त भ्रष्टाचारविरोधी प्रकरणासाठी महत्वाचे पद आहे. नागरिक कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा निवडून आलेल्या प्रतिनिधीविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी थेट लोकायुक्तांकडे करू शकतात, ज्यांच्याकडे जलद निवारणाचे काम आहे.
महाराष्ट्रात लोकायुक्तांचे अधिकार काय आहेत?
राज्यात लोकायुक्तांचा आदेश बंधनकारक असतो. तो स्वीकृत किंवा फेटाळण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही. अर्थात, लोकायुक्तांच्या सर्वच आदेशांचे सरकारकडून पालन होत नाही हेही तेवढेच सत्य.
सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून पदाचा गैरवापर, भ्रष्टाचार होत असल्यास त्याविषयीच्या तक्रारींची दखल घेऊन, योग्य ते निर्देश देण्याचे अधिकार लोकायुक्तांना आहेत.
महाराष्ट्राचे लोकायुक्त: न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे
शपथ: राज्यपाल
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांच्याशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर राज्यपाल लोकायुक्तांची नियुक्ती करतात.
लोकायुक्तांशी सल्लामसलत केल्यानंतर उप-लोकायुक्तांची नियुक्ती केली जाते.
कार्यकाळ: पाच वर्ष
लोकप्रियतेत महाराष्ट्राचा चित्ररथ देशात प्रथम

महाराष्ट्राच्या चित्ररथास ‘लोकपसंती’ या वर्गवारीत देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आलं आहे
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी झालेल्या १२ राज्ये/ केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात सहभागी झालेला जैवविविधता व राज्य मानके या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास ‘लोकपसंती’ या वर्गवारीत देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राजपथावरील पंथसंचलन संपल्यानंतर पोर्टलवर ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाइन मतनोंदणी सुरू होती.
त्यात भारतीय नौदलाच्या संचलन तुकडीला तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून घोषित करण्यात आले, तर लोकप्रिय निवडीनुसार भारतीय हवाई दलाची संचलन तुकडी तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून निवडली गेली आहे, तर याच श्रेणीमध्ये राज्याच्या चित्ररथाची सर्वोत्तम म्हणून निवड झाली.
राज्याच्या चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंच आणि ६ फूट रुंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
चित्ररथावर राज्यफुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोटय़ा आकर्षक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या.
चित्ररथावर मोठया आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसेच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ दर्शविण्यात आले. .
या चित्ररथाची संकल्पना रेखाचित्र व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या तरुण मूर्तिकार व कलादिग्दर्शक यांनी केले होते.
यावर्षीचा हा चित्ररथ नागपूरच्या ‘शुभ अॅड्स’ने तयार केला आहे.
चीन वसंतोत्सव साजरा करत आहे, हा सर्वात महत्वाचा वार्षिक उत्सव आहे
चीन स्प्रिंग फेस्टिव्हल साजरा करत आहे, हा सर्वात महत्वाचा वार्षिक सण आहे कारण त्याने चंद्राच्या नवीन “Year of the Tiger” प्रवेश केला आहे. गतवर्ष हे बैलांचे चंद्र वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. चीनी राशिचक्र कॅलेंडरनुसार, बैलांचे वर्ष संपले आहे आणि वाघाचे वर्ष 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाले आहे आणि 21 जानेवारी 2023 रोजी संपेल.
चिनी संस्कृतीत, वाघ शौर्य, जोम आणि सामर्थ्य यांचे प्रतीक आहे आणि असे मानले जाते की तो लोकांना संकटातून बाहेर काढू शकतो आणि अंतिम शुभ आणि शांतता आणू शकतो
हे देखील वाचा :
- UPSC मार्फत विविध पदांच्या 705 जागांसाठी भरती
- बँक ऑफ बडोदा विविध पदांच्या 518 जागांसाठी भरती
- युनियन बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2691 जागांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स पाससाठी संधी…
- बँक ऑफ बडोदामध्ये 4000 जागांसाठी मेगाभरती ; पात्रता पदवी पास
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1194 पदांची भरती ; 80000 पगार मिळेल, पात्रता पहा..