मुंबईच्या नावे नकोसा विक्रम, जगात अव्वल
- मुंबईच्या वाहतूक कोंडीने आता जागतिक विक्रम केला आहे. कारण जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर म्हणून मुंबईची ओळख झाली आहे. त्यामुळे नको असलेला विक्रम मुंबईच्या नावे झाला आहे.
- ‘टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१८’च्या सर्व्हेतून हा निष्कर्ष समोर आला आहे. जगभरातील ५६ देशांतील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या ४०३ शहरांचा सर्व्हेमध्ये अभ्यास करण्यात आला आहे. जगभरातील ४०३ शहरांमधील वाहतुकीचा वेग आणि वाहतूक कोंडीसंदर्भातील पाहणी करुन निरिक्षणे नोंदवली आहेत.
- सर्व्हेतील निरिक्षणानुसार वाहतूककोंडीमध्ये मुंबई अव्वल स्थानावर आहे. तर त्यानंतर अनुक्रमे बोगोटा, लीमा, नवी दिल्ली आणि मॉस्को या शहरांचा नंबर लागतो.
पालघरमधल्या आदिवासी मुलाचा पराक्रम, सर केले जगातील सर्वोच्च शिखर
- पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या एका आदिवासी मुलाने माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर करुन दाखवण्याचा पराक्रम केला आहे. केतन जाधव असे या मुलाचे नाव असून तो वाडा तालुक्यातील माधवराव काणे आश्रमशाळेत ११ व्या इयत्तेत शिकत आहे. २३ मे रोजी पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी केतन माऊंट एव्हरेस्टवर पोहोचला.
- एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शौर्य-२ ही मोहीम आखली होती. या मोहिमेसाठी आदिवासी प्रकल्प विभागामार्फत वेगवेगळया जिल्ह्यातील ११ मुलांची निवड करण्यात आली होती. या अकरा मुलांमध्ये केतन जाधवही होता.
दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियाला 8 दशलक्ष डॉलरची मदत
- दारिद्रयामुळे अडचणीत आलेल्या उत्तर कोरियाला मानवतावादी भूमिकेतून 8 दशलक्ष डॉलरची मदत देण्यास दक्षिण आफ्रिकेने मंजूरी दिली आहे.
- दक्षिण कोरियाकडून 2015 पासून प्रथमच उत्तर कोरियाला आर्थिक मदत दिली जात आहे. उत्तर कोरियामध्ये यंदा सर्वात कमी धान्य उत्पादन झाले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. उत्तर कोरियाकडून दिली जाणारी ही मदत संयुक्त राष्ट्राच्या माध्यमतून दिली जाणार आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जेई यांनी उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये मध्यस्थी करण्याच्या हेतूने हनोई येथे आयोजित केलेली शिखर परिषद अपयशी ठरल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.