भारतातील अन्न वाया जाण्याचे प्रमाण 68.7 दशलक्ष टन
संयुक्तराष्ट्र संघाच्या एका संस्थेने तयार केलेल्या एका अहवालानुसार जगात तयार अन्न वाया घालवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून सन 2019 मध्ये जगभरातून एकूण 931 दशलक्ष टन अन्न वाया गेले आहे.
भारतात या वाया घालवण्यात आलेल्या अन्नाचे प्रमाण 68.7 दशलक्ष टन इतके आहे.
सन 2021चा जो फूड इंडेक्स रिपोर्ट सादर करण्यात आला आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यातील 61 टक्के अन्न घरगुती स्वरूपातील आहे, तर 26 टक्के अन्न हॉटेल व अन्नसेवा क्षेत्राचे आहे. आणि 13 टक्के वाया गेलेले अन्न रिटेल क्षेत्राचे आहे. याचा अर्थ एकूण जागतिक अन्न उत्पादनापैकी 17 टक्के उत्पादन हे अक्षरश कचराकुंडीत जाते आहे.
या वाया जाणाऱ्या अन्नाचे नेमके वजन लक्षात येण्यासाठी या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, 40 टनी 23 दशलक्ष ट्रक या अन्नाने पुर्ण भरतात. भारतातही वाया जाणाऱ्या अन्नाचे प्रमाण लक्षणीय असून भारतात दरवर्षी 68760163 टन अन्न वाया जाते. हे प्रमाण प्रति व्यक्ती सरासरी 50 किलो इतके आहे. अमेरिकेत हे प्रमाण प्रती व्यक्ती 59 किलो इतके आहे. तर चीन मध्ये वाया जाणाऱ्या अन्नाचे प्रमाण दर माणशी दर वर्षी 64 किलो इतके आहे.
कमी उत्पन्न गटाच्या लोकांमध्ये अन्न वाया घालवण्याचे प्रमाण कमी असेल असे वाटले होते पण या अभ्यासात मात्र तसे काही आढळून आले नाही. गरीब आणि श्रीमतांमध्ये अन्न वाया घालवण्याची सवय जवळपास सारखीच असल्याचे दिसून आले आहे. अन्न सेवा देणाऱ्या केंद्रांमध्ये 5 टक्के इतके आणि किरकोळ विक्री केंद्रांमध्ये सरासरी 2 टक्के इतके अन्न वाया जात असते.
मेरी कोमला कांस्यपदक
सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या एमसी मेरी कोमला संघर्षपूर्ण उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत व्हावे लागल्याने बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या ३७ वर्षीय मेरीला अमेरिकेच्या विर्जिनिया फच्स हिने हरवले.
तत्पूर्वी, सतीश कुमार (९१ किलोवरील) आणि आशीष कुमार (७५ किलो) यांनी उपांत्य फेरी गाठली. सतीशने डेन्मार्कच्या गिवस्कोव्ह नील्सनला ५-० असे, तर आशीषने इटलीच्या रेमो सल्वातीला ४-१ असे पराभूत केले.
सिमरनजित कौर (६० किलो) तसेच जास्मिन (५७ किलो) आणि पूजा राणी (७५ किलो) यांनी अंतिम फेरी गाठली. जास्मिनने इटलीच्या सिरिन चाराबी हिला तर सिमरनजितने प्यूएटरे रिकोच्या किरिया तापिया हिला हरवले. पूजाने पनामाच्या अथेयना बायलॉन हिच्यावर वर्चस्व गाजवले.
नीरज चोप्राचा नवा राष्ट्रीय विक्रम
भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा याने यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करत इंडियन ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली.
नीरजने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शुक्रवारी ८८.०७ मीटर अशी कामगिरी नोंदवली.
त्याने २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत नोंदवलेला ८८.०६ मीटरचा विक्रम मागे टाकला.
उत्तर प्रदेशच्या शिवपाल सिंह याने ८१.६३ मीटरसह रौप्यपदक पटकावले. हरयाणाचा साहिल सिलवाल ८०.६५ मीटर कामगिरीसह तिसरा आला.
२४ वर्षीय चोप्राने पहिल्या प्रयत्नांत ८३.०३ मीटर अशी कामगिरी केल्यानंतर त्याचे दोन प्रयत्न फोल ठरले. चौथ्या प्रयत्नांत त्याने ८३.३६ मीटर अशी कामगिरी केल्यावर पाचव्या वेळी त्याने ८८.०७ मीटर भालाफेक केला. अंतिम प्रयत्नांत मात्र त्याला ८२.२४ मीटर इतकीच कामगि करता आली.