⁠  ⁠

चालू घडामोडी : ०७ जुलै २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 07 July 2020

जागतिक बॉक्सिंग क्रमवारी : बॉक्सर अमित पांघल अव्वलस्थानी

Untitled 19 3
  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता तसेच जागतिक रौप्यपदक विजेता भारताचा बॉक्सर अमित पांघल याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीमध्ये पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
  • ‘एआयबीए’ने तब्बल १८ महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच क्रमवारी जाहीर केली.
  • सहा जागतिक सुवर्णपदकांची मानकरी ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिला ५१ किलो वजनी गटात तिसरे स्थान मिळाले आहे.
  • २०१८च्या नवी दिल्ली येथील जागतिक सुवर्णपदक विजेती उत्तर कोरियाची पँग चोल-मी (२३५० गुण) आणि तुर्कीच्या बुसीनाझ काकीरोग्लू (२००० गुण) यांच्यानंतर मेरीने १५०० गुणांची कमाई करत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
  • जागतिक रौप्यपदक विजेती मंजू राणी हिने ४८ किलो वजनी गटात ११७५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. आसामच्या लव्हलिना बोर्गोहेन, जमुना बोरो आणि शिवा थापा यांनीही क्रमवारीत चांगली झेप घेतली आहे.
  • ६९ किलो गटात लव्हलिनाने तिसरे स्थान पटकावले आहे. ५४ किलो गटात जमुना बोरो पाचव्या स्थानी आहे, तर शिवा थापा याने ६० किलो गटात १६व्या क्रमांकावर मजल मारली आहे. एल. सरिता देवी मात्र ६० किलो गटात २५व्या स्थानी आहे.

देशातील १२ टक्के स्टार्टअपला टाळे

startup
  • देशातील १२ टक्के स्टार्टअप बंद पडले असून, तब्बल ७० टक्के स्टार्टअपची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या गंभीर झाली आहे.
  • इंडस्ट्री चेंबर फिक्की व इंडियन एंजेल नेटवर्क यांनी ‘भारतीय स्टार्टअपवर झालेला करोनाचा प्रभाव’ या विषयावर एक पाहणी केली.
  • या पाहणीच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार ३३ टक्के स्टार्टअपने आपली गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तर १० टक्के स्टार्टअपचे करार संपुष्टात आले आहेत. केवळ २२ टक्के स्टार्टअपकडेच पुढील तीन ते सहा महिने निर्धारित खर्चासाठी निधी उपलब्ध आहे. तर ६८ टक्के स्टार्टअपनं खर्चाला कात्री लावण्यास सुरूवात केली आहे.

इस्रायलचा नवा हेरगिरी उपग्रह

cats 38
  • इस्रायलने सोमवारी नवा हेरगिरी उपग्रह सोडला. त्यामुळे त्या देशाच्या लष्करी हेरगिरी करण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. विशेषत: इराणसारख्या प्रबळ शत्रूकडील आण्विक ताकद ही इस्रायलची डोकेदुखी आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी इस्रायल आपल्या टेहळणी क्षमतेत वाढ करत आहे.
  • ओफेक 16 हा उपग्रह सोमवारी पहाटे अवकाशात सोडण्यात आला. त्यासाठी इस्रायली बनावटीचे शाविट रॉकेटचा वापर करण्यात आला. आधुनिक क्षमतेचे इलेक्‍ट्रो ऑप्टीकल रेकन्सिअन्स सॅटेलाईट असे या उपग्रहाचे वर्णन संरक्षण मंत्रालयाने केले आहे.
  • या उपग्रहाकडून एक आठवड्यात प्रतिमा मिळण्यास सुरवात होईल. सरकारी इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने हा उपग्रह बनवला आहे. त्यातील तांत्रिक बाजू संरक्षण संस्था एल्बीट सिस्टिमने सांभाळली अहे.

Share This Article