Uncategorized
Current Affairs 07 June 2019
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चीनची ‘५जी’ उडी
- चीन सरकारची मालकी असलेल्या चार बडय़ा टेलिकॉम कंपन्यांना ५जी सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी चीन सरकारने व्यापारी परवाने मंजूर केले. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या आघाडीवर तणावपूर्ण संबंध आहेत. या पाश्र्वभूमीवर जगात अतिवेगवान वायरविहिन जाळे तयार करण्यात आघाडी घेण्याची चीनची महत्त्वाकांक्षा दिसून येत आहे.
- चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (एमआयआयटी) चीन टेलिकॉम, चीन मोबाइल, चीन युनिकॉम आणि चीन रेडिओ आणि टेलिव्हिजन या कंपन्यांना ‘५जी’चे व्यापारी परवाने दिले आहेत.
- ५जी हे अत्यंत प्रगत दूरसंपर्क तंत्रज्ञान आहे. सध्याच्या ४जी एलटीई तंत्रज्ञानापेक्षा त्याचा डाऊनलोडचा वेग हा १० ते १०० पट असल्याचे सांगितले जाते
- अर्थव्यवस्थेत या तंत्रज्ञानामुळे १०.६ लाख कोटी (१.५४ लाख कोटी अमेरिकी डॉलर) येन इतकी भर पडण्याची अपेक्षा.
सन २०१० ते २०२५ दरम्यान ३० लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होण्याची आशा, चीनच्या माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान अकादमीच्या अहवालात व्यक्त.
चीनचे समुद्रातून अंतराळात रॉकेट लाँच
- चीनने बुधवारी पहिल्यांदा समुद्रात तरंगणाऱ्या लाँच पॅडवरून अंतराळात यशस्वीरित्या रॉकेट लाँच केले.
शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार शानडोंग प्रांतातील समुद्रातील तरंगणाऱ्या लाँच पॅडवरून चीनने हे रॉकेट लाँच केले. - यामाध्यमातून चीनने तब्बल सात उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले. तरंगत्या लाँचपॅडवरून अंतराळात रॉकेट सोडणारा चीन हा तिसरा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका आणि रशियाने तरंगत्या लाँच पॅडवरून अंतराळात रॉकेट सोडले होते.
- बुधवारी दुपारी चीनच्या वेळेनुसार 12 वाजून 6 मिनिटांनी लाँग मार्च-11 सॉलिड प्रोपेलंट कॅरिअर रॉकेट अंतराळात सोडण्यात आले. चीनच्या लाँग मार्च कॅरिअर रॉकेट सीरीजचे हे 306 वे अभियान आहे. अवकाशात सोडण्यात आलेल्या सात उपग्रहांपैकी 2 उपग्रह तंत्रज्ञानाच्या विकासासाठी वापण्यात येणारे उपग्रह आहेत.
- तर उर्वरित पाच लहान उपग्रहांचा वापर व्यावसायिक उपग्रह म्हणून करण्यात येणार आहे. या उपग्रहांपैकी 2 मोठे उपग्रह Bufeng-1A आणि Bufeng-1B ची निर्मिती चायना अॅकॅडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी इन बिजिंगने केली आहे. याचा वापर हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठीही केला जाणार आहे.
- गेल्या काही वर्षांपासून चीनने स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तसेच 2030 पर्यंत सुपरपावर बनण्याची चीनची इच्छा आहे.
RTGS, NEFT वरील शुल्क रद्द; RBI चा खातेधारकांना दिलासा
- रिझर्व्ह बँकेने आरटीजीएस आणि एनईएफटीवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत.
- सध्या बँकांडून 2 ते 5 लाख रूपयांच्या आरटीजीएससाठी 25 रूपये अधिक जीएसटी आणि 5 लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी 50 रूपये अधिक जीएसटी आकारण्यात येतात. तसेच 10 हजार रूपयांपर्यंतच्या एनईएफटीसाठी 2.50 रूपये अधिक जीएसटी, 10 हजारांपेक्षा अधिक रकमेसाठी 5 रूपये अधिक जीएसटी, 1 ते 2 लाखांपर्यंतच्या रकमेसाठी 15 रूपये अधिक जीएसटी आणि 2 लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी 25 रूपये अधिक जीएसटी असे शुल्क आकारण्यात येते.
जगातल्या सगळ्यात लांब पाइपलाइनचा मार्ग खुला
- जगातली सगळ्यात मोठी एलपीजी पाइपलाइन टाकण्यासाठी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्यांनी करार केला आहे. गुजरातमधल्या कांडलापासून ते उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरपर्यंत एलपीजीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे
- इंडियन ऑइलने या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून 2,757 कि.मी लांबीची ही पाइपलाइन तीन राज्यांना पश्चिम किनारपट्टीशी जोडणार असल्याचे सांगितले. या तीन सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांच्या 22 एलपीजी प्रकल्पांना गॅसचा पुरवठा होणार आहे.
- कांडला ते गोरखपूर या पाइपलाइनसाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. इंडियन ऑइलचा 50 टक्के व भारत पेट्रोलियम व हिंदुस्तन पेट्रोलियमचा प्रत्येकी 25 टक्के हिस्सा असलेल्या संयुक्त कंपनीच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात पाव टक्के कपात
- नवी दिल्ली- मंदावलेला विकास आणि वाढलेली बेकारी यामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने तिसऱ्यांदा व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मधील दुसरे द्वैमासिक पतधोरण गुरुवारी जाहीर झाले. या आधी रेपो रेट 6 टक्के होता जो आता 5.75 टक्के करण्यात आला आहे.
- देशभरातील बॅंका जेव्हा रिझर्व्ह बॅंकेकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतात, त्यावेळी जो व्याज दर रिझर्व्ह बॅंक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. तर ज्यावेळी बॅंका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बॅंकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करतात, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
can i have daily 1 liner current affairs in english