---Advertisement---

चालू घडामोडी : ०९ डिसेंबर २०२०

By Chetan Patil

Published On:

Current Affairs 09 December 2020
---Advertisement---

Current Affairs : 09 December 2020

भारतीय वंशाचे राज चौहान कॅनडात सभापती

Raj Chauhan

भारतीय वंशाचे राज चौहान हे कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांताच्या विधानसभेचे सभापती म्हणून निवडले गेले आहेत.
या पदावर निवड होणारे ते पहिलेच भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी ठरले आहेत.
चौहान हे ब्रिटीश कोलंबिया विधानसभेमध्ये बर्नाबे-एडमोंडस मतदारसंघातून पाचवेळेस निवडून जात आहेत.
त्यांनी यापूर्वीच्या सरकारमध्ये उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
सभापती डॅरेला प्लाकास निवृत्त झाल्यावर ते सभापती पदाची सूत्रे स्वीकारतील.

90 वर्षीय महिलेला दिली जगातील पहिली करोनाची ‘लस’

ब्रिटनमध्ये जाहीर केल्याप्रमाणे या आठवड्यात कोरोनाची लस सर्वसामान्यांना दिली जाण्याचे काम सुरू झाले असून आयर्लंडमधील एका 90 वर्षीय महिलेला फायझर बायोएनटेकची लस देण्यात आली आहे.
कोरोनाची लस दिली जाणारी ती जगातली पहिली व्यक्ती ठरली आहे.
मार्गारेट किनान हे पहिली लस टोचण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

एव्हरेस्टच्या उंचीत वाढ

Image

नेपाळ आणि चीनने संयुक्तपणे एव्हरेस्टची नेमकी उंची किती आहे याची आधुनिक साधनांनी मोजणी करून त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत.
त्यानुसार एव्हरेस्टची नेमकी उंची 8848.86 मीटर इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारताने सन 1954 साली एव्हरेस्टची उंची मोजली होती. त्यापेक्षा ही उंची 86 सेंटीमीटरने जास्त भरली आहे.
या आधी चीनने एकट्याने सन 1975 आणि 2005 मध्ये एव्हरेस्टची उंची मोजली होती. त्यावेळी ती अनुक्रमे 8848.13 मीटर आणि 8844.43 मीटर इतकी असल्याचे नमूद करण्यात आले होते.

इन्व्हेस्ट इंडियाला संयुक्तराष्ट्रांचा गुंतवणूक पुरस्कार

देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या इन्व्हेस्ट इंडिया अभियानाने ‘संयुक्त राष्ट्र गुंतवणूक संवर्धन पुरस्कार २०२०’ पटकावला आहे.
केंद्राच्या या अभियानाला अंकटाड या यूएनच्या संस्थेने सोमवारी विजेता घोषित केले. इन्व्हेस्ट इंडियाची निवड जगभरातील १८० देशांच्या गुंतवणूक प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांमधून झाली आहे.

mpsc telegram channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now