अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस २० जुलैला अंतराळात जाणार
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस जुलै महिन्यात अंतराळ प्रवास करणार आहेत.
जेफ बेजोस यांनी ब्ल्यू ओरिजिन नावाची स्पेस कंपनी स्थापन केली आहे.
जेफ बेजोसने आपल्या स्पेसक्राफ्टला एनएस-१४ नाव दिलं आहे. या स्पेस क्राफ्टचं चाचणी यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
जेफ बेजोस अंतराळात जाणारे पहिले श्रीमंत व्यक्ती असतील.
कंपनीने लाँच चाचणीदरम्यान नव्या बूस्टर आणि अपग्रेड केलेल्या कॅप्सूलचं परीक्षण केलं होतं.
या अपग्रेडेड वर्जनमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा तपासल्या गेल्या.
मेक्सिकोला नमवून अमेरिका अजिंक्य
ख्रिस्तियन पुलिसिचने अतिरिक्त वेळेत नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या बळावर अमेरिकेने मेक्सिकोवर ३-२ अशी सरशी साधून नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवले.
अंतिम सामन्यात मॅम्युएल करोना (पहिले मिनिट) आणि दिएगो लेन्झ (७९ मि.) यांनी मेक्सिकोसाठी गोल केले. मात्र रेयान (२७ मि.) आणि वेस्टॉन मॅकेनी (८२ मि.) यांनी अमेरिकासाठी गोल नोंदवल्यामुळे सामना अतिरिक्त वेळेपर्यंत लांबला.
अखेर ११४व्या मिनिटाला कालरेस साल्चेडोने पुलिसिचला पेनल्टी क्षेत्रात पाडल्यामुळे अमेरिकेला पेनल्टी बहाल करण्यात आली आणि पुलिसिचनेच तिसरा गोल झळकावला.
सहा मिनिटांनी मार्क मॅकेन्झीच्या हाताला चेंडू लागल्यामुळे मेक्सिकोलाही पेनल्टी मिळाली, परंतु कर्णधार आंद्रेस गॉर्डाडोने टोलवलेला चेंडू गोलरक्षक एथान हॉवर्टने अडवल्यामुळे अमेरिकेचा विजय निश्चित झाला.
शाश्वत विकासाच्या क्रमवारीत भारताची घसरण
शाश्वत विकासाच्या क्रमवारीत भारताची दोन स्थानांची घसरण झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य देशांनी २१५ साली शाश्वत विकासाचं २०३० सालचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकूण १७ मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं होतं.
यात आता भारताच्या क्रमवारीत गेल्या वर्षापेक्षा दोन स्थानांची घसरण झाली आहे.
दोन स्थानांच्या घसरणीसह भारत आता ११७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारताच्या पर्यावरण अहवाल २०२१ मधून झालेल्या खुलासानुसार भारत शाश्वत विकासाच्या क्रमवारीत गेल्या वर्षी ११५ व्या स्थानावर होता. पण आता त्यात दोन स्थानांची घसरण होऊन ११७ व्या स्थानी पोहोचला आहे. अन्न सुरक्षेचं लक्ष्य प्राप्त करुन भूकबळी नष्ट करणे, लैंगिक समानतेचं ध्येय गाठणे, सतत सर्वसमावेशक औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देणे आणि नवविचारांना प्रेरणा देणे या प्रमुख मुद्द्यांमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे भारताच्या क्रमवारीत घट झाल्याचं सांगण्यात येत आहे.