---Advertisement---

Current Affairs – 1 September 2018

By Rajat Bhole

Updated On:

gdp
---Advertisement---

भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP ८.२ टक्के

  • भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP अर्थात विकास दर ८.२ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीतली ही आकडेवारी समोर आली आहे. मागील १८ तिमाहीतील ही सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.
  • २०१७ मध्ये जीडीपी ७.७ टक्क्यांवर आला होता. नोटाबंदीमुळे विकासदर घसरला आणि अर्थव्यवस्था कोलमडली अशी टीका होत असतानाच विकास दर ८.२ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.
  • सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्थेतील एप्रिल ते जून या तिमाहीत विकास दरात मोठी वाढ झाली आहे. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर विकासदरात घसरण झाली होती. मात्र आता या तिमाहीत विकासदराने मोठी उसळी घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य शासन – विविध विकास महामंडळं, मंडळं आणि प्राधिकरण नियुक्त्या 

---Advertisement---
  • राज्य शासनाने विविध विकास महामंडळं, मंडळं आणि प्राधिकरणांच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांवर २१ नियुक्त्या केल्या आहेत.
  • महाराष्ट्र म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सिडकोच्या अध्यक्षपदी पनवेल भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या नितीन बानुगडे पाटील यांना नियुक्त करण्यात आले आहे. मधु चव्हाण यांना मुंबई गृह निर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) अध्यक्षपद देण्यात आले आहे.

डॉलरच्या तुलनेत रूपयाची ऐतिहासिक घसरण

  • आंतरराष्‍ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. शुक्रवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर ७१ रुपयांच्या नीचांकी स्तरावर आला. गुरूवारच्या तुलनेत आज शुक्रवारी रुपया १७ पैशांनी घसरला.
    सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.९१ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
  • महिनाअखेर बाजारात डॉलरची वाढती मागणी आणि कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातून पैसे काढण्यास सुरूवात केल्याचा फटका रूपयाला बसला.
  • आंतरराष्ट्रीय बाजापपेठेमध्ये डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. भारत ८० टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सतत वाढ होतेय तर डॉलरच्या तुलनेत रूपयाची सतत घसरण होत असल्यामुळे तेल कंपन्यांना जास्त दराने कच्चे तेल आयात करावे लागत आहे.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now