तुषार मेहता भारताचे नवे महाधिवक्ता
- ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. रंजीतकुमार यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद भरण्यात आले नव्हते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये रंजीतकुमार यांनी राजीनामा दिला होता.
- कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने भारताच्या महाधिवक्तापदी मेहता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.
- मेहता यांनी माहिती अधिकार कायदा कलम ६६ अ प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडली आहे.
Youth Olympic : १५ वर्षाच्या जेरेमीने रचला इतिहास,
पटकावले सुवर्णपदक
पटकावले सुवर्णपदक
- अर्जेंटीनात सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत १५ वर्षाच्या वेटलिफ्टिर जेरेमी लालरिनुंगाने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सोमवारी रात्री उशीरा जेरेमीनने सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे.
- जेरेमी लालरिनुंगाने ६२ किलो वजनी गटामध्ये हा पराक्रम केला आहे. यापूर्वी वर्ल्ड युथ स्पर्धेत जेरमीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
अजित डोवाल बनले देशातील सर्वात प्रबळ अधिकारी;
सरकारने दिली नवी जबाबदारी
सरकारने दिली नवी जबाबदारी
- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर केंद्र सरकारने नवी जबाबदारी सोपवली आहे. स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपच्या (एसपीजी) कॅबिनेट सचिव ऐवजी ते आता या ग्रुपचे अध्यक्ष असतील.
- या नव्या जबाबदारीमुळे ते गेल्या वीस वर्षांतील सर्वात प्रबळ सरकारी अधिकारी बनले आहेत. विदेशी, देशांतर्गत आणि आर्थिक सुरक्षा प्रकरणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) मदतीसाठी १९९९ मध्ये एसपीजीची स्थापना करण्यात आली होती.
- यापूर्वी कॅबिनेट सचिवांकडेच एसपीजीचे अध्यक्षपद असायचे. सरकारमधील हे सर्वात वरिष्ठ सरकारी अधिकारी असतात.
- दरम्यान, यापूर्वी एसपीजीमध्ये १६ सदस्य होते. ज्यांची संख्या वाढवून आता १८ करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट सचिव आणि नीति आयोगाचे उपाध्यक्ष यांना दोन नव्या सदस्यांच्या रुपात समाविष्ट करण्यात आले आहे. एसपीजीच्या इतर सदस्यांमध्ये तीनही सैन्यदलांचे प्रमुख, रिझर्व्ह बँकेचे प्रमुख, गृह सचिव, वित्त सचिव, संरक्षण सचिव, परराष्ट्र सचिव आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखांचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत
निक्की हॅले यांचा राजीनामा
निक्की हॅले यांचा राजीनामा
- संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूनत निक्की हॅले यांनी राजीनामा दिला आहे. हॅले या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असून ट्रम्प प्रशासनातील पहिल्या महिला असून त्यांना कॅबिनेट दर्जाचे स्थान आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील पहिली महिला होण्याचा मान भारतीय वंशाच्या निक्की हॅले यांना मिळाला होता. निक्की हॅले यांची संयुक्त राष्ट्रातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सध्या हॅले दक्षिण कॅरिलोना राज्याच्या राज्यपाल आहे.
नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC
टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel