देश-विदेश
‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज जदयूच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जदयुच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने त्यांची निवड करण्यात आली. पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे.Current Affairs for mpsc
प्रियदर्शिनी चॅटर्जी ‘मिस इंडिया २०१६’ची विजेती
‘फेमिना मिस इंडिया २०१६’च्या अंतिम फेरीचा दिमाखदार सोहळा शनिवारी अंधेरीतील यशराज स्टुडियोमध्ये पार पडला. यावेळी ‘मिस इंडिया २०१६’च्या विजेतेपदाचा मुकूट गुवाहाटीच्या प्रियदर्शिनी चॅटर्जी हिने पटकावला. बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खानने प्रियदर्शनीच्या नावाची घोषणा केली. बंगळूरची सुश्रुती कृष्णा हिला प्रियदर्शनीच्या पाठोपाठ प्रथम उपविजेतीचा मान मिळाला, तर लखनौची पंखुरी गिडवानी ही द्वितीय उपविजेती ठरली.Current Affairs in marathi
महाराष्ट्र
‘पाणी एक्स्प्रेस’ उद्या लातूरला पोहचणार
राज्याच्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी पोहोचविण्यासाठी राजस्थानच्या कोटा येथून निघालेली रेल्वेची ‘पाणी एक्सप्रेस’ उद्या लातूरकरांची तहान भागवणार आहे. पाणी एक्स्प्रेस पाच लाख लिटर पाणी घेऊन उद्या संध्याकाळी लातूरला पोहचेल. या गाडीला प्रत्येकी ५४ हजार लीटर क्षमतेच्या ४९ वाघिण्या असून, मिरज रेल्वे स्थानकात त्यात पाणी भरून ते लातूरला पोहोचविले जाणार आहे.Current Affairs book in marathi
क्रीडा
जगज्जेतेपदासाठी झुंज!
# बुद्धिबळात वयापेक्षाही तल्लख बुद्धी व एकाग्रता यालाच अधिक महत्त्व आहे. भारताच्या विश्वनाथन आनंद या अनुभवी खेळाडूने अजूनही आपण अव्वल दर्जाचा खेळ करू शकतो याचा प्रत्यय घडविला. त्यामुळेच जागतिक आव्हानवीर स्पर्धेत शेवटच्या फेरीपर्यंत चुरस राहिली व त्यामध्ये सर्जी कर्जाकिन या तरुण खेळाडूने बाजी मारली. आता त्याच्यासमोर मॅग्नस कार्लसनचे आव्हान असणार आहे.chalu ghadamodi mpsc