⁠  ⁠

Current Affairs 10 June 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन

  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तथा बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे आज वयाच्या 81 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
  • गिरीश कर्नाड यांनी अलीकडच्या काळात सलमान खान याच्या एक था टायगर आणि टायगर जिंदा है या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. गिरीश कर्नाड यांचा जन्म महाराष्ट्रातील माथेरान येथे 19 मे 1938 रोजी झाला होता चित्रपटांसह नाटक आणि दिग्दर्शन क्षेत्रात देखील कर्नाड यांनी भरीव योगदान दिले आहे.

दिल्लीचे संरक्षण करणार अमेरिकेचे क्षेपणास्त्र; भारत खरेदी करणार NASAMS-II

  • देशाची राजधानी राजधानी सुरक्षित राहावी यासाठी आता भारत अमेरिकेकडून नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम – II (NASAMS-II) खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
  • भारत याचा उपयोग स्वदेशी, रशियन आणि इस्त्रायली तंत्रज्ञान प्रणाली एकत्रित करून हवाई ढाल बनवण्यासाठी करणार आहे. दरम्यान, हे क्षेपणास्त्र खरेदी केल्यास दिल्लीवर कोणत्याही क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचा, तसेच ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासूनही संरक्षण मिळणार आहे.
  • अमेरिका NASAMS-II या क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी अंतिम मसुद्याचे स्वीकृती पत्र जुलै ते ऑगस्टदरम्यान पाठवण्याची शक्यता आहे. 6,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च असलेल्या परदेशी सैन्य विक्री कार्यक्रमाअंतर्गत अमेरिका भारताला या क्षेपणास्राची विक्री करणार आहे.
  • सध्या अमेरिका भारतावर टर्मिनल हाय अॅल्टीट्यूड एरिया डिफेंस (THAAD) आणि पॅट्रियट अॅडव्हाँस्ड कॅपेबिलिटी (PAC-3) मिसाइल डिफेंस सिस्टमच्या खरेदीवर विचार करण्यासाठी दबाव टाकत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5.43 अब्ज डॉलर्सच्या उन्नक एस – 400 टायम्फ या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाच स्क्वाड्रन्ससाठी रशियाशी यापूर्वीच व्यवहार करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवमध्ये पोहोचल्यानंतर राजधानी माले येथील विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, एका द्विपक्षीय कार्यक्रमात मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ने राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
  • तत्पूर्वी मारदीवच्या भेटीवर आलेल्या मोदींनी सोलिह यांना टीम इंडियाची एक बॅट भेट दिली. यावर भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बर्टीचे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद

  • ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बर्टीने शनिवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले.
    आठव्या मानांकित बर्टीने फक्त एक तास व १० मिनिटे रंगलेल्या अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा व्होंड्रोसोव्हाला ६-१, ६-३ अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारून कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली.
  • या विजयासह बर्टीने जागतिक टेनिस क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्याशिवाय तब्बल ४६ वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या एखाद्या टेनिसपटूने फ्रेंच स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी मार्गारेट कोर्टने १९७३ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

Share This Article