---Advertisement---

Current Affairs – 10 September 2018

By Rajat Bhole

Updated On:

---Advertisement---

US Open 2018 Womens Final : जपानची नाओमी ओसाका ठरली विजेती, सेरेनाचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं

  • अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या २० वर्षीय नाओमी ओसाकाने इतिहासाची नोंद केली आहे. अंतिम फेरीत नाओमीने अमेरिकेची आघाडीची टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा ६-२, ६-४ अशा सेट्समध्ये पराभव केला. कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी नाओमी ओसाका ही पहिली महिला जपानी खेळाडू ठरली आहे.
  • नाओमी आणि सेरेना यांच्या वयामध्ये अंदाजे १६-१७ वर्षाचं अंतर आहे. सेरेनाने आपल्या कारकिर्दीत १९९९ साली पहिल्यांदा अमेरिकन ओपन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं, यावेळी नाओमी ही अवघ्या १ वर्षाची होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात नाओमीने सेरेनाच्या अनुभवाचा आपल्या खेळावर अजिबात दबाव येऊ दिला नाही. सेरेनाच्या प्रत्येक फटक्यांना सफाईदारपणे उत्तर देत नाओमीने आपल्या पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

telegram ad 728

प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने मरण्याचा अधिकार : सरन्यायाधीश

  • इच्छामरणाबाबत अत्यंत महत्त्वाचं भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी, ‘कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती आत्महत्या करु शकत नाही, मात्र प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे’ असं म्हटलं आहे.
  • ‘एखाद्या व्यक्तीला दुर्धर आजाराने ग्रासलं असेल आणि त्याला इच्छा मरण हवं असेल तर तो ‘इच्छामरणाचे मृत्यूपत्र’ बनवू शकतो’, ‘अंतिम श्वास कधी घ्यायचा याचा प्रत्येकाला अधिकार आहे. फक्त संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसावा’, असं दीपक मिश्रा म्हणाले. पुण्यामध्ये ‘बॅलन्सिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल राइट्स’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
  • विशेष म्हणजे, याच वर्षी 9 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने एक ऐतिहासिक निर्णय देताना मराणासन्न व्यक्तीच्या इच्छामरणाच्या मृत्यूपत्राबाबत मार्गदर्शकतत्त्व घालून देत कायदेशीर मान्यता दिली होती आणि अखेरचा श्वास कधी घायचा याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला असेल अशी टीप्पणी केली होती.

केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार-२०१८ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला ४ पुरस्कार जाहीर

  • रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • मनरेगा अंतर्गत गडचिरोली जिल्हा सर्वोत्तम : गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक यांच्या नेतृत्वात आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 8 हजार 894 कामांना सुरुवात झाली यातून दोन वर्षात 39.12 लाख मनुष्य दिन निर्मिती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये मनरेगाअंतर्गत वैयक्तिक कामांवर भर देण्यात आला आहे आतापर्यंत जिल्ह्यात शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी 6 हजार 750 कामे पूर्ण झाली आहेत.
  • मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातीलच गडचिरोली ब्लॉक मधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे. सरपंच अजय मशाखेत्री यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायतीने एनआरएमची कामे हाती घेतली व लवकरच एनआरएमची 38 कामे पूर्णत्वास नेली या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली.
  • ठाणे जिल्ह्यातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नूतन प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे.

add header new

---Advertisement---

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now