चालू घडामोडी – ११ एप्रिल २०१६
देश-विदेश
दुबईत बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारतीची निर्मिती!
# सुप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीपेक्षा उंच इमारतीची निर्मिती करण्याची तयारी दुबईमध्ये सुरू आहे. बुर्ज खलिफा इमारत जगातील सध्याची सर्वात उंच इमारत आहे. मात्र, दुबई क्रिक हार्बर परिसरातील एका नवीन टॉवरचा सहा वर्ग किलोमीटरचा मास्टर डेव्हलपमेंट प्लॅन हा ८२८ मीटर उंच असलेल्या बुर्ज खलिफा इमारतीपेक्षा काहीसा उंच असल्याची माहिती विकासक एम्मारने दिली आहे. chalu ghadamodi 2016 mpsc
मंदिर दुर्घटनेत १०६ मृत्युमुखी
# केरळमधील कोल्लम जिल्ह्य़ात परावायूर येथील पुत्तिंगल देवी मंदिराच्या संकुलात रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत १०६ भाविकांचा मृत्यू झाला असून, ३८० जण जखमी झाले. आतषबाजीदरम्यान फटाक्याच्या गोदामावर ठिणगी पडल्याने स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. या प्रकरणी मंदिर प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.spardha pariksha chalu ghadamodi 2016 mpsc
नासाच्या केप्लर अवकाशयानात बिघाड
# पृथ्वीसारख्या अनेक बाह्य़ग्रहांचा शोध घेणारे केप्लर अवकाशयान आता आपत्कालीन स्थितीत गेले आहे व ते सध्या पृथ्वीपासून ७.५० कोटी मैल अतंरावर आहे, असे अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने म्हटले आहे. पृथ्वीशी संपर्क मंदावल्याने केप्लर यानाची दुरुस्ती करणे हे आता नासाच्या अभियंत्यांपुढचे मोठे आव्हान आहे. यानाचा ९ एप्रिलला संपर्क झाला तेव्हा केप्लर यान आपत्कालीन स्थितीत गेल्याचे अभियंत्यांच्या निदर्शनास आले होते. या अवस्थेत यानाची संचालन स्थिती अवघड असते व इंधनही संपत आलेले असते. प्रारंभीच्या अंदाजानुसार केप्लर यान आकाशगंगेच्या मध्याकडे वळवण्याच्या पूर्वी आपत्कालीन अवस्थेत गेले आहे. Current Affairs for mpsc in marathi 2016
महाराष्ट्र
महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱयात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय
# शनिशिंगणापूरनंतर आता कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सोमवारी एकमताने घेण्यात आला. अंबाबाई भक्त समिती, श्रीपूजक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पोलीस अधिकारी यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यापुढे मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळणार आहे. या निर्णयानंतर काही महिलांनी प्रातिनिधिक स्वरुपात गाभाऱ्यात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे.mpsc spardha pariksha 2016
नवे डान्सबार नियमन विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर
# नव्या डान्सबार नियमन विधेयकाला सोमवारी विधान परिषदेत एकमताने मंजुरी मिळाली. हे विधेयक मंगळवारी विधानसभेत मांडण्यात येणार आहे. नव्या विधेयकात शाळा आणि धार्मिक स्थळापासून एक किलो मीटरच्या परिसरात डान्सबारना परवानगी मिळणार नसून बारच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचीही तरतूद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बारबालांना स्पर्श करणाऱ्यांना सहा महिने तर बारबालांच्या शोषणास जबाबदार असणाऱ्यांना तीन वर्षे शिक्षा आणि १० लाखाचा दंड अशी तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.mission mpsc app
जळगावमध्ये राष्ट्रीय डाळिंब परिषद
# सर्वत्र टंचाईची स्थिती असतानाही ज्या ठिकाणी थोडेफार पाणी असेल त्या पाण्याचा काटेकोर वापर करून शेतकऱ्यांना समृद्धीचा मंत्र देणाऱ्या ऊतिसंवíधत डाळिंब पिकाविषयी व्यापक मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने येथे जैन इरिगेशन सिस्टीम्स आणि अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ यांच्या वतीने १६ ते १८ एप्रिल या कालावधीत ‘डाळिंब उत्पादनातील आव्हाने व संधी’ या विषयावर राष्ट्रीय डाळिंब परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असून पालकमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे प्रमुख पाहुणे असतील. Current Affairs in marathi
क्रीडा
भारताला दुहेरी जेतेपद
# भारताच्या पुरुष व महिला संघांनी इंदूर येथे पार पडलेल्या आशियाई खो-खो स्पध्रेच्या अंतिम फेरीत उदयोन्मुख बांगलादेश संघांचा पराभव करून दुहेरी जेतेपद पटकावले. स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून भारताच्या अनिकेत पोटे व सारिका काळे यांना गौरविले.marathi chalu ghadamodi
भारताचा कॅनडावर विजय
# उत्कंठापूर्ण लढतीत भारताकडून निक्किन थिमय्या (तिसरे मिनिट), हरमनप्रीत सिंग (४१ वे मिनिट) व तलविंदर सिंग (५७ वे मिनिट) यांनी गोल नोंदवले. कॅनडाकडून एकमेव गोल कीगान पिएराने २४व्या मिनिटाला केला. या सामन्यात भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले व या दोन्ही संधींचा लाभ त्यांनी घेतला. कॅनडाला पाच वेळा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली, मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही.chalu gadamodi app
अर्थशास्त्र
परदेशातून आणलेल्या वस्तूंवर 15 टक्के सीमाशुल्क
# नवी दिल्ली – वर्षभराच्या परदेशातील वास्तव्यानंतर भारतात परतताना सोबत आणलेल्या रंगीत टीव्ही, होम थिएटर सिस्टम आणि दागिन्यांशिवाय इतर स्वरुपात आणलेल्या सोने-चांदीवर नागरिकांना 15 टक्के सीमाशुल्क भरावे लागणार आहे.mpsc Current Affairs