Current Affairs 11 April 2020
नाणेनिधीच्या सल्लागार गटात रघुराम राजन यांचा समावेश

करोनामुळे जगासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक मुद्दय़ांवर सल्लामसलतीसाठी एका गटाची स्थापना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली आहे. त्यात रिझर्वबँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह ११ जणांची नेमणूक केली आहे.
नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी ही निवड केली असून, इतर सदस्यात सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री थरमन शण्मुगरत्नम, मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूटचे प्राध्यापक क्रिस्टिन फोर्बस, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केव्हीन रूड, संयुक्त राष्ट्रांचे माजी उप महासचिव लॉर्ड मार्क मलोच ब्राऊन यांचा समावेश आहे.
आशियाई विकास बँक भारताच्या मदतीला

आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलरची (१६५०० कोटी रुपये ) मदत करोनाचा सामना करण्यासाठी देण्याचे ठरवले आहे.
या बँकेचे अध्यक्ष मासत्सुगु असाकावा यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करोना विरोधात लढण्यासाठी २.२ अब्ज डॉलर म्हणजे १६५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
त्याचबरोबरकर कपात व इतर सवलतींसह १.७ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेचेही स्वागत केले आहे. २६ मार्च रोजी सीतारामन यांनी ही १.७ लाख कोटींची मदत योजना जाहीर केली होती.
आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे ठरवले असून त्यातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करता येईल. लघु व मध्यम उद्योगांना सावरण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. गरज वाटल्यास आशियाई विकास बँक भारताला आणखी आर्थिक मदत देईल. बँकेने याआधी भारतासह काही देशांना ६.५ अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली होती. आशियाई विकास बँकेची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली होती. आशिया व पॅसिफिकमधील एकूण ६८ देश या बँकेचे सदस्य आहेत.
कोटक महिंद्र बँकेचे सीईओ उदय कोटक वर्षभरासाठी एक रुपया वेतन घेणार

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोटक महिंद्र बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी वर्षभरासाठी केवळ एक रुपया वेतन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या शिवाय त्यांनी पंतप्रधान मदत निधीसाठी वैयक्तिक २५ कोटी रुपयांचा निधी देण्याचीही घोषणा केली आहे. करोना विषाणूमुळे होणारे नुकसान पाहता आर्थिक वर्ष २०२०-२१साठी आपण केवळ एक रुपया वेतन घेणार असल्याची घोषणा कोटक यांनी केली.
लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात ‘व्ही सेफ टनेल’ स्थापन
‘व्ही सेफ टनेल’ लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात स्थापन करण्यात आले आहे.
राज्य पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात तेलंगणामध्ये ‘व्ही सेफ टनेल’ बसविण्यात आले आहे
लोकांमध्ये स्वच्छतेचे महत्व प्रसारित करण्याचे उद्दिष्ट सदर संकल्पाचे आहे. राज्यातील कोरोना विषाणूचा स्थानिक प्रसार कमी करण्यासाठी ‘व्ही सेफ टनेल’ नावाचा एक अनोखा जंतुनाशक कोणत्याही संभाव्य जीवाणू आणि इतर सूक्ष्मजंतूंपासून लोकांना बचावण्याचे कार्य करतो.जंतुनाशकांमध्ये स्प्रेच्या रूपात जलविद्राव्य पॉलिमर आणि आयोडीनचे मिश्रण समाविष्ट आहे.