---Advertisement---

Current Affairs 12 April 2018

By Saurabh Puranik

Published On:

---Advertisement---

1) 10वीच्या पाठ्यपुस्तकात आता GSTसह म्युच्युअल फंड आणि एसआयपीचेही धडे

डिजिटल इंडियाकडे वाटचाल करतांना कॅशलेश व्यवहारांबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच अार्थिक गुंतवणुकीबाबत पायाभूत माहिती व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. शेअर बाजार म्हणजे नेमके काय, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक कशी करावी, जीएसटी करप्रणाली काय आहे, याबाबतचे धडे दहावीच्या पाठयपुस्तकातून मिळणार आहे. त्यासाठी बालभारतीने दहावीच्या गणिताच्या पुस्तकात या विषयांचा समावेश केला आहे.

नोटाबंदीनंतर म्युच्युअल फंड, एसआयपीमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मात्र नागरिकांना म्युच्युअल फंड अथवा एसआयपीमध्ये गुंतवणूक कशी करावी, जीएसटीबाबतही पुरेशी माहिती नाही. याचा विचार करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातच ही पायाभूत माहिती व्हावी, तसेच गुंतवणुकीसंदर्भात तोंडओळख व्हावी या उद्देशाने दहावीच्या गणित विषयात यंदा जीएसटीच्या धड्याच्या समावेश करण्यात आला आहे.

2) 10वा डिफेन्स एक्स्पो: मोदींच्या हस्ते मेक इन इंडिया स्टॉलचे उद्घाटन

डिफेन्स एक्सपोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेक इन इंडिया स्टॉलचे उद्घाटन झाले. यंदा एक्सपोची थीम ‘भारत: उद्योन्मुख संरक्षण हब’ ठेवण्यात आली आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, स्वीडन आणि फिनलँडसह 47 देशांच्या 163 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. 10 एप्रिलपासून सुरु झालेला एक्स्पो 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे. शेवटच्या दिवशी एक्स्पो सर्वसामान्यांसाठी खुला राहाणार आहे.

3) भारत-चीन अधिकाऱ्यांची अण्वस्त्र प्रसारबंदीवर चर्चा

भारत व चीनच्या अधिकाऱ्यांनी बीजिंगमध्ये अण्वस्त्र प्रसारबंदीच्या मुद्द्यावर चर्चा केली. चीनमध्ये भारतीय दूतावासाने याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेसाठी स्थापन तंत्राच्या महत्त्वावर भर दिला.

यादरम्यान अण्वस्त्राच्या मुद्द्यावर बहुपक्षीय मंचांवर नि:शस्त्रीकरण व अण्वस्त्र प्रसारबंदीच्या दिशेने प्रगती झाली, आंतरराष्ट्रीय सुरक्षेत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या भूमिकेसह परस्पर हितांच्या विविध विषयांवरही चर्चा झाली. चीनच्या विरोधामुळे भारत अणुपुरवठादार गटात(एनएसजी) सहभागी होऊ शकत नाही. भारत यासंदर्भात चीनचा दृष्टिकोन बदलण्याचा सतत प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या महिन्यात चीन दौऱ्यावर जाणार आहेत.

4) भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अव्वल

भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. आज बॅडमिंटनची जागतिक क्रमवारी जाहीर झाली. डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सलसनला पराभूत करत श्रीकांतने पहिला क्रमांक मिळवला आहे.

जागतिक क्रमवारीत श्रीकांत ७६८९५ गुणांनी पहिल्या स्थानावर आहे. तर डेन्मार्कचा वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर एक्सलसन ७५४७० गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोरियाचा सोन वेन हू हा आहे. त्याला ७४६७० गुण आहेत.

जागतिक क्रमवारीत महिला गटात भारताची पी. व्ही. सिंधू ७८८२४ गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चीनची ताइ जू इंग ही ९०२५९ गुणांनी अव्वल स्थानावर आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now