चालू घडामोडी – १२ मार्च २०१६
विदेश
एफ -१६ विमाने नाकारण्याचा ठराव सिनेटने फेटाळला
पाकिस्तानला एफ -१६ विमाने देऊ नयेत अशी मागणी करणारा ठराव सिनेटने फेटाळला असून, आता त्या देशाला ही लढाऊ जेट विमाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ७०० दशलक्ष डॉलर्सची ही विमाने असून, ती पाकिस्तानला देऊ नयेत कारण तो देश विश्वास ठेवण्याजोगा नाही असे सांगून काही वरिष्ठ सिनेटर्सनी पाकिस्तानला एफ १६ लढाऊ विमाने विकण्यास विरोध केला होता. हा ठराव ७१ विरुद्ध २४ मतांनी फेटाळला गेला आहे.
‘रेस्टॉरंट ऑफ दि इयर’चा मान ‘रेड फोर्ट’ उपाहारगृहाला
मुघल दरबारातील पदार्थ बनविणाऱ्या ‘रेड फोर्ट’ या दक्षिण आशियाई उपाहारगृहाने इंग्लडमधील या वर्षांतील ‘सर्वश्रेष्ठ उपाहारगृहाचा’ पुरस्कार पटकावला आहे. ‘एशियन व्हॉईस’ या साप्ताहिकाने ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या आवारात राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील यशस्वींना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. अमीन अली यांनी स्थापन केलेल्या उपहारगृहाला यावेळी सभागृहाचे उपाध्यक्ष इलेनॉर लाइंग यांच्या हस्ते खासदार कीथ वाझ व इतर खासदारांच्या उपस्थित हा पुरस्कार देऊन संन्मानीत करण्यात आले आहे. current affairs in marathi 2016
देश
देशभरातील रेशन दुकानांचे तीन वर्षांत संगणकीकरण
सरकार देशभरातील सर्व स्वस्त धान्य दुकाने (रेशन दुकाने) मार्च २०१९ पर्यंत संगणकीकृत करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी राज्यसभेत सांगितले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील गैरप्रकार रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले.
इस्रोकडून उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
इस्रोने गुरुवारी आयआरएनएसएस-१एफ उपग्रहाचे पीएसएलव्ही सी३२ मार्फत अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी३२ यान अवकाशात सोडण्यात आले आणि त्याने आयआयएनएसएस-१एफ हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला. आयआरएनएसएस-१एफ हा सात उपग्रहांच्या मालिकेतील सहावा उपग्रह आहे. मालिकेतील पहिला उपग्रह जुलै २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. current affairs in marathi for mpsc
अर्थव्यवस्था
क्रिसिलकडून सार्वजनिक बँकांची ‘पत’झड!
भारतातील आघाडीची पतमानांकन संस्था असलेल्या क्रिसिलने देशातील आठ सावर्जनिक बँकांचे पतमानांकन शुक्रवारी कमी केले. या बँकांच्या मालमत्ता गुणवत्ता स्थितीवरून हा बदल करण्यात आल्याचे क्रिसिलने स्पष्ट केले आहे. क्रिसिलने गुणवत्ता मानांकन कमी केलेल्या बँकांमध्ये बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सिंडिकेट बँक आणि यूको बँक यांचा समावेश आहे. daily current affairs notes in marathi 2016
औद्योगिक उत्पादनाची घसरणीची ‘हॅट्ट्रिक’
सलग तिसऱ्या महिन्यात उणे स्थितीत राहताना देशाचे औद्योगिक उत्पादन निर्देशांक जानेवारी २०१६ मध्येही – १.५ टक्के या नकारात्मक स्तरावर राहिला आहे. निर्मिती आणि भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रातील सुमार प्रतिसादामुळे दराने अर्थव्यवस्थेवरील मंदी स्पष्ट केली आहे. निर्मिती क्षेत्रातील २२ उद्योगांपैकी १० क्षेत्रात नकारात्मकतेचे दर्शन घडले आहे. औद्योगिक उत्पादन दरामध्ये गणली जाणारी निर्मिती प्रामुख्याने भांडवली वस्तू उत्पादनातील तब्बल २०.४ टक्क्य़ांच्या घसरणीमुळे यंदा विस्तारली आहे.