Current Affairs 13 January 2020
केंद्र सरकार २०० फायटर जेट्स खरेदी करणार
भारताच्या हवाई दलात लढाऊ विमानांची कमतरता भासू नये, यासाठी केंद्र सरकार लवकरच २०० फायटर जेट्स विमान खरेदी करणार
हिंदुस्तान अॅरोनॉटिकल्स लिमिटेडकडून तयार करण्यात येत असलेले ८३ तेजस लढाऊ विमानांचे कंत्राट शेवटच्या टप्प्यात.
८३ लढाऊ विमाना शिवाय ११० अन्य विमानांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण २०० लढाऊ विमान खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही ८३ तेजस लढाऊ विमानांच्या कंत्राटाला लवकरच अंतिम रूप देणार आहोत.
भारतीय हवाई दलात सध्या मिराज २०००, सुखोई ३० एमकेईआय आणि मिग-२९ यासारखे लढाऊ विमान आहेत. याशिवाय जॅग्वार आणि मिग २१ बायसन यांचाही समावेश आहेत. परंतु, ही विमाने आता काळाच्या ओघात जुनी झाली आहेत. विशेष म्हणजे, मिग २७ या लढाऊ विमानाने अखेरचे उड्डान केले आहे. कारगिल युद्धाच म्हत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या मिग २७ या लढाऊ विमानाचे जोधपूर एअरबेसवर जवळपास ४ दशके सेवा दिल्यानंतर अखेरचे उड्डाण केले.
सर्वाधिक वेतन देण्यात बेंगळुरू अव्वल
नोकरदारांमध्ये सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अव्वल स्थान पटकावले असून, सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांमध्ये आयटी नगरी बेंगळुरूने यंदा बाजी मारून ‘हॅट्ट्रिक’ लाधली आहे. २०१७ आणि २०१८मध्येही सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांच्या यादीतही बेंगळुरूच अव्वल होते.
‘रँडस्टँड इनसाइट्स सॅलरी ट्रेंड्स रिपोर्ट २०१९’ या अहवालात नमूद केल्याप्रमाणे बेंगळुरूमधील कनिष्ठ कर्मचाऱ्याला वार्षिक ५.२७ लाख रुपये, त्यापेक्षा अधिक अनुभवी कर्मचाऱ्याला वार्षिक १६.४५ लाख रुपये आणि वरिष्ठ कर्मचाऱ्याला वार्षिक ३५.४५ लाख रुपये वेतन मिळत आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटात वार्षिक ५ लाख रुपये आणि ४.५९ लाख रुपयांचे वेतन देऊन हैदराबाद आणि मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. मध्यम गटातील कर्मचाऱ्यांच्या गटात वार्षिक १५.०७ लाख रुपये आणि १४.५ लाख रुपयांचे वेतन देऊन मुंबई आणि नॅशनल कॅपिटल रिजनने दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. या शिवाय मुंबई आणि पुण्याने वार्षिक ३३.९५ लाख रुपये आणि ३२.६८ लाख रुपये वेतन देऊन अतिवरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटात दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.
बॅडमिंटन : केंताे मोमोताने पहिल्यांदा जिंकला मलेशिया मास्टर्स किताब
अव्वल मानांकित केंताे माेमाेताने रविवारी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचा किताब पटकावला. त्याने फायनलमध्ये डेन्मार्कच्या व्हिक्टर एलेक्सनवर मात केली.त्याने २४-२२, २१-११ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने पहिल्यांदाच याच स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महिला गटात चीनची चेन फेई किताबाची मानकरी ठरली.
सेरेनाला तीन वर्षांतील पहिले जेतेपद
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आई झाल्यानंतर पहिले जेतेपद रविवारी ऑकलंड क्लासिक टेनिस स्पर्धेतून पटकवले.
तिने बिगरमानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा ६-३, ६-४ पराभव केला. तब्बल तीन वर्षांनंतर सेरेनाला जागतिक स्तरावरील टेनिस स्पर्धा जिंकता आली. मात्र त्याहीपेक्षा सेरेनाने खिलाडूवृत्ती दाखवली ती ऑस्ट्रेलियातील वणव्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी तिची बक्षीस रक्कम दान करुन.
याआधी गरोदर असताना म्हणजेच २०१७मध्ये सेरेनाने ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकवले होते. आता तिच्या महिलांच्या ‘डब्ल्यूटीए’ जेतेपदांची संख्या ७३वर पोहचली आहे. तिने पहिले जेतेपद १९९९मध्ये मिळवले होते.
तेजसचे आयएनएस विक्रमादित्यवर अॅरेस्टेड लँडिंग; यश मिळवणारा भारत सहावा देश
भारतीय नाैदलाच्या तेजस या स्वदेशी हलक्या लढाऊ विमानाने (एलसीए) नाैदलाच्या ‘अायएनएस विक्रमादित्य’ विमानवाहू जहाजावर पहिल्यांदाच यशस्वी अॅरेस्टेड लँडिंग केले. भारत हा अॅरेस्टेड लँडिंग करणारा सहावा देश ठरला. या अाधी रशिया, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन व चीन यांनी यश मिळवले अाहे. डीअारडीअाेचे अधिकारी म्हणाले, कमांडर जयदीप मावलकर यांनी हे लँडिंग केले. त्यामुळे नाैदलाची अाॅन डेक कामकाजाची क्षमता वाढेल. अाता नाैदलाचा दुहेरी इंजिन असलेले तेजस विमान विकसित करण्याचा मार्ग माेकळा झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीअारडीअाे व नाैदलाचे अभिनंदन केले. ते ट्विट करताना म्हणाले की, ‘हे यशस्वी लंॅडिंग भारतीय लढाऊ विमानांच्या इतिहासातील शानदार घटना अाहे’.
नाैदलात समावेश करण्यासाठी दाेन गाेष्टी महत्त्वाच्या
विमानाचा नाैदलात समावेश करण्यासाठी दाेन गाेष्टी महत्वाच्या अाहेत. पहिली त्यांचा हलकेपणा व दुसरा अॅरेस्टेड लंॅडिंग. युद्धनौका एक विशिष्ट वजन उचलण्यास सक्षम आहे. म्हणूनच विमाने हलकी असणे आवश्यक आहे. युद्धनौकावरील धावपट्टीची लांबी निश्चित असते. अशावेळी लढाऊ विमानांना लंॅडिंगच्या वेळी वेग कमी करून लहान धावपट्टीवर लवकर थांबवावे लागते.