चालू घडामोडी : १३ जून २०२१
भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव
उत्कृष्ट पत्रकारिता आणि साहित्यकृतीसाठी दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. भारतीय वंशाच्या मेघा राजगोपालन यांना ही पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय पत्रकारीता प्रकारात मिळालेला हा पुरस्कार मेघा राजागोपालन यांनी इंटरनेट मीडिया बझफिड न्यूजच्या दोन सहकाऱ्यांसोबत वाटून घेतला आहे.
राजगोपालन या बझफीड न्यूजच्या पत्रकार असून भारतीय वंशाच्या ज्या दोन पत्रकारांना हा पुरस्कार मिळाला त्यात त्यांचा समावेश आहे. टंपा बे टाइम्सचे नील बेदी हे स्थानिक वार्तांकन करतात, कॅथलनी मॅकगोरी यांच्यासमवेत संभाव्य गुन्हेगार शोधून काढणाऱ्या नगरपालांच्या एका योजनेचा पर्दाफाश त्यांनी केला होता.
फ्रेंच ओपन : बाबरेरा क्रेजिकोव्हाने पटकावले जेतेपद
रोलँड गॅरोस येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत चेक प्रजासत्ताकाच्या बाबरेरा क्रेजिकोव्हाने महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे.
४० वर्षांनंतर एका चेक प्रजासत्ताकच्या महिलेने हे विजेतेपद जिंकले आहे. जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानी असलेल्या बाबरेराने अंतिम फेरीत रशियाच्या अॅनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हाचा ६-१, २-६, ६-४ असा पराभव केला.
बाबरेरापूर्वी हाना मेंडलीकोवाने १९८१ मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती चेक प्रजासत्ताकची पहिली महिला खेळाडू ठरली.
काही दिवसांपूर्वी स्ट्रान्सबर्ग येथे जेतेपद पटकावणाऱ्या क्रेजिकोव्हाने कारकीर्दीत ३३व्या क्रमांकावर मजल मारली होती.
उपांत्य फेरीत ग्रीसच्या मारिया सकारी हिच्याबरोबर तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत विजय मिळवून क्रेजिकोव्हाने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
अमेरिकेत फेडरल न्यायाधीश झालेले ‘जाहीद कुरेशी’ पहिले मुस्लिम
अमेरिकन सिनेटने मुळ पाकिस्तानचे असलेले अमेरिकन जाहिद कुरेशी यांना न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात नियुक्तीस मान्यता दिली आहे.
ही नियुक्ती ऐतिहासिक मानल्या जात आहे. त्यामुळे जाहिद कुरेशी यांना देशाच्या इतिहासातील पहिले मुस्लिम फेडरल न्यायाधीश होण्याचा मार्ग मोकळा झाला.
मतदानामध्ये ८१ जणांनी ४६ वर्षीय जाहिदच्या बाजूने तर १६ जणांच्या विरोधात मतदान केले.
कुरेशी सध्या न्यू जर्सी जिल्ह्यातील दंडाधिकारी न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत. परंतु न्यू जर्सीच्या अमेरिकेच्या जिल्हा कोर्टाच्या न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतल्यानंतर एक नवीन इतिहास तयार होईल.