फेब्रुवारीमधील महागाई दर ५.०३ टक्क्यांवर
अन्नधान्यांच्या वाढत्या किंमतींने महागाई दर यंदा ५ टक्क््यांवर पोहोचला असून त्याने गेल्या तीन महिन्यांचा उच्चांक या रूपात नोंदवला आहे.
किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित फेब्रुवारीमधील महागाई दर ५.०३ टक्क््यांवर पोहोचला आहे. व्याजदर बदलासाठी रिझव्र्ह बँकेला आवश्यक असलेले हे मापन मध्यवर्ती बँकेच्या सहनशील अशा ४ टक्क््यांच्या खूप पुढे गेले आहे.
अन्नधान्यांच्या किंमती महिन्याभरात दुप्पट झाल्याने यंदा महागाई दर वाढल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकेडवारीवरून स्पष्ट झाले.
यापूर्वी महागाईचा दर, नोव्हेंबर २०२० मध्ये ६.९३ टक्के असा अधिकचा होता. यंदा अन्नधान्याच्या किंमती जवळपास ४ टक्क््यांपर्यंत पोहोचल्या आहेत. तर इंधन तसेच ऊर्जा क्षेत्रातील वस्तूंच्या किंमती साडे तीन टक्क््यांपर्यंत नोंदल्या गेल्या आहेत. अन्नधान्यांमध्ये प्रामुख्याने तेल, फळे तसेच प्रथिनेयुक्त पदार्थ महाग झाले आहेत. तुलनेत दूध, दुग्धजन्य पदार्थ, डाळी, अंडी, मांस व मासे यांच्या किंमती स्थिरावल्या आहेत.
भांडवली वस्तू, निर्मित वस्तू तसेच खनिकर्म क्षेत्रातील निराशाजनक कामगिरीमुळे जानेवारीमधील औद्योगिक उत्पादन निर्देशांक उणे १.६ टक्के नोंदला गेला आहे. निर्देशांकात ७७.६ टक्के वाटा असलेल्या निर्मिती क्षेत्राची कामगिरी यंदा उणे २ राहिली आहे. त्याचबरोबर भांडवली वस्तू क्षेत्रात ९.६ टक्के घसरण नोंदली गेली आहे. खनिकर्म क्षेत्रात ३.७ टक्के उतार झाला आहे.
गौतम अदानींची संपत्तीत सर्वाधिक भर
संपत्तीत सर्वाधिक भर नोंदविणाऱ्यांमध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रक्रम राहिला आहे. याबाबत त्यांनी रिलायन्सचे मुकेश अंबानी तसेच टेस्लाचे एलन मस्क यांनाही मागे टाकले आहे.
अदानी एंटरप्राइजेसचे अध्यक्ष गौतम अदानी यांची निव्वळ मालमत्ता वर्ष २०२१ मध्ये आतापर्यंत १६.२ अब्ज डॉलरने वाढून ५० अब्ज डॉलर झाली आहे.
ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या निर्देशांकांमध्ये अदानी यांचे नाव संपत्तीत भर टाकण्यामध्ये अग्रणी आहे.
अदानी समूहातील जवळपास सर्वच सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य चालू वर्षात थेट ५० टक्क्यांपर्यंत झेपावले आहे. समूह वीज, खनिकर्म, वायू, बंदर, विमानतळ अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे.
समूहाने गेल्या वर्षी, २०२० मध्ये मालमत्तेतील तब्बल ५३२ टक्के वाढ नोंदवली होती. पैकी सर्वाधिक १८ अब्ज डॉलर मालमत्ता अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची आहे. अदानी टोटल गॅसचे मूल्य सर्वाधिक, ९७ टक्क्यांनी वाढले आहे. तर मुख्य प्रवर्तक अदानी एंटरप्राइजेस ८७ टक्क्यांनी वाढला. अदानी एनर्जी ग्रीनचे मूल्य तूर्त १० टक्क्यांनी वाढले आहे.
यूएसए क्रिकेटचे पराग मराठेच अध्यक्ष
पराग मराठे या भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे अमेरिका क्रिकेट संघटनेचे संचालकपद कायम ठेवण्यात आले आहे. त्यांचा कार्यकाल पुढील तीन वर्षांसाठी कायम ठेवण्यात आला आहे
यापूर्वी मराठे यांनीच अमेरिका संघटनेचे अध्यक्षपद सोडण्याचा विचार व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांच्याकडे लिड्स युनायटेड फुटबॉल क्लबचे संचालक म्हणून ते कार्यरत होते.