Uncategorized
Current Affairs – 13 October 2018
#MeToo प्रकरणांच्या तपासासाठी समिती स्थापन करण्याची
मनेका गांधींची घोषणा
- #MeToo अंतर्गत समोर येणाऱ्या प्रकरणांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी हि घोषणा केली.
- तपासासाठी निवृत्ती न्यायाधीशांची चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल असे मनेका गांधी यांनी सांगितले.
- #MeToo मोहिम सर्वातआधी २०१७ साली टि्वटरवरुन सुरु झाली होती. त्यावेळी ७० महिलांनी हॉलिवूड निर्माता हार्वे विनस्टिनवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
UN मानवाधिकार समितीवर भारताची निवड
- संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीत भारताचा सामावेश झाला आहे. भारताने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वाच्या निवडणुकीत विजय मिळवला. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये सर्वाधिक १८८ मतांनी या समितीवर भारताची निवड करण्यात आली.
- १ जानेवारी २०१९ पासून तीन वर्षांसाठी भारताची या समितीवर निवड करण्यात आली आहे. गुप्त मतदानाने ही निवडणूक पार पडली. त्यात निवडून येण्यासाठी किमान ९७ मतांची आवश्यकता होती. संयुक्त राष्ट्राचे सदस्य असले्लया १९३ देशांनी मानवाधिकार समितीतील नव्या देशांच्या सदस्यात्वासाठी मतदान केले. यापैकी १८८ देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले.
- दरम्यान, आशिया-पॅसिफिक गटात भारताशिवाय बहरिन, बांगलादेश, फिजी आणि फिलिपाइन्स या देशांनीही दावेदारी सांगितली होती. मात्र भारताचं पारडं आधीपासूनच जड होतं. यापूर्वी भारत २०११-१४ आणि २०१४-१७ असा दोन वेळा मानवाधिकार परिषदेचा सदस्य राहिला आहे.
ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवींचे निधन
- भारतीय शास्त्रीय संगीतात आपला खास ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. शास्त्रीय संगीतातले अलौकिक व्यक्तीमत्त्व म्हणून अन्नपूर्णा देवी देशाला परिचित होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या एकांतवासातच गेल्या होत्या. सतार वादनातले त्यांचे कौशल्य अनन्यसाधारण होते. पद्मभूषण या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC
टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel