Nobel Prize 2020 मिल्ग्रोम, विल्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
गेल्या आठवडा भरापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. नोबेल समितीकडून आज शेवटच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
त्यानुसार, सन २०२०चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर झाला आहे.
मिलग्रोम आणि विल्सन यांना हा पुरस्कार लिलावाचा सिद्धांतात सुधारणा आणि नव्या पद्धतींच्या शोधांसाठी देण्यात आला आहे.
हे दोघेही अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी अशा वस्तू आणि सेवांसाठी लिलावाची नवी प्रक्रिया तयारी केली ज्या पारंपारिक पद्धतीने विकणे कठीण आहे.
या पद्धतीच्या शोधामुळे जगभरातील विक्रेते, खरेदीदार आणि करदात्यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे.
भारताचे माजी फुटबॉलपटू कार्लटन चॅपमन यांचे निधन
भारताच्या फुटबॉल संघाचे माजी कर्णधार कार्लटन चॅपमन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बेंगळूरु येथे सोमवारी पहाटे निधन झाले.
ते 49 वर्षांचे होते. बायचुंग भूतिया, आय. एम. विजयन आणि चॅपमन असे त्रिकूट 1990च्या दशकात प्रसिद्ध होते.
1990च्या सुरुवातीला टाटा फुटबॉल अकादमीकडून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1997 मध्ये सॅफ चषक पटकावला होता.
1996-97 मध्ये झालेली पहिलीवहिली नेशन्स फुटबॉल लीग जेसीटीने जिंकण्यात चॅपमन, भूतिया आणि विजयन या त्रिकुटाचे योगदान मोलाचे राहिले.