---Advertisement---

Current Affairs 14 March 2018

By Saurabh Puranik

Published On:

stephen_hawking
---Advertisement---

1) ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरांसंदर्भात त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांना वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झाला. हॉकिंग एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. हॉकिंग यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल अॅन्ड बेबी युनिवर्सेस अन्ड इदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस यासारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भौतिकशास्त्रातले जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. २००१ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील विज्ञानक्षेत्रातील संशोधन संस्थेने आयोजीत केलेल्या ‘स्ट्रींग’ या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्या परिषदेत हॉकिंग्ज यांनी दिलेलं व्याख्यान प्रसिद्ध आहे. टीआयएफआरने त्यांना सरोजिनी दामोदरन फेलोशिपही दिली आहे. 1966 साली स्टीफन यांनी “प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिग युनिवर्सेस” हा प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधास लिहून 50 वर्षे उलटून गेल्यानंतर तो 2017 मध्ये संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंब्रिजने घेतला. 24 तासांच्या अवधीमध्ये हा प्रबंध 60 हजार लोकांनी डाऊनलोड केला, त्यामुळे केंब्रिज विद्यापिठाचे संकेतस्थळच क्रॅश झालं होतं.

2) ‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ

‘आधार’ सक्तीच्या घटनात्मक वैधतेवर निकाल होईपर्यंत बँक खाती आणि मोबाइल फोन ‘आधार’शी जोडून घेण्याची सक्ती लागू होणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्याने, कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. न्यायालयाने १५ डिसेंबरला दिलेल्या अंतरिम आदेशाने बँक खाती ‘आधार’शी जोडून घेण्यास व मोबाइल फोन ग्राहकांनी ‘आधार’शी निगडित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास ३१ माचपर्यंत मुदत वाढवून दिली होती. न्यायालयाने मंगळवारी ही मुदत हटविली आणि आधीचा अंतरिम आदेश अंतिम निकाल होईपर्यंत लागू केला. मात्र, केंद्र व राज्य सरकारांच्या ज्या योजनांचे लाभ व अनुदान यासाठी ‘आधार’ क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्या लाभार्थींसाठी ‘आधार’ जोडणीसाठी ३१ मार्च हीच अंतिम मुदत कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ‘आधार’ सक्तीस आव्हान देणाºया देशभरात दाखल झालेल्या याचिकांवर सध्या सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. ए. के. सिक्री, न्या. अजय खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. अशोक भूषण यांच्या घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे.

3) नीरव मोदी घोटाळ्यानंतर बँकांच्या ‘एलओयू’वर बंदी

रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांच्या ‘लेटर आॅफ अंडस्टँडिंग’ (एलओयू) व लेटर आॅफ क्रेडिट (एलओसी) वर बंदी आणली आहे. नीरव मोदी घोटाळ्यानंतर बँकेने हे पाऊल उचलले आहे. वस्तूची आयात करण्यासाठी देशातील बँकेच्या विदेशातील खात्यातून कर्ज मिळविण्याची सुविधा एलओयू किंवा एलओसीमुळे मिळते. या कर्जाची जबाबदारी एलओयू देणा-या बँकेची असते.

4) बेळगावात फडकला देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज

बेळगावातील किल्ला तलावाच्या काठावर ११0 मीटर (३६0 फूट) उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. देशातील सर्वाधिक उंचीच्या अटारी सीमेवरील राष्ट्रध्वजाच्या उंचीएवढा तो आहे.
या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राच्या बँडने केवळ पाचच मिनिटांत मशीनच्या साहाय्याने ध्वज फडकाविला आणि त्याला मानवंदना दिली. भारत-पाक अटारी सीमेवरील ध्वज आणि बेळगावच्या ध्वजाची उंची एकसमान झाली आहे. राष्ट्रध्वजाच्या उद्घाटन सोहळ्यात बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी लिफ्ट मशीनचे बटन दाबून ध्वज फडकावला. या ध्वजासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून खास परवानगी मिळविण्यात आली असून कायमस्वरूपी हा ध्वज फडकवत ठेवला जाणार आहे.

उंच उभारलेले राष्ट्रध्वज –

बेळगाव ३६0 फूट (कर्नाटक)
अटारी सीमा ३६0 फूट (पंजाब)
कोल्हापूर ३0३ फूट (महाराष्ट्र)
पहाडी २९३ फूट (रांची,मंदिर झारखंड)
हैदराबाद २९१ फूट (तेलंगण)

5) डाेनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांना पदावरून हटवले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी काही मतभेदांमुळे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांना पदावरून हटवले अाहे. एका वर्षात अापल्या चमुमध्ये अनेक बदल करणाऱ्या ट्रम्प यांचा हा सर्वात माेठा बदल मानला जात अाहे. टिलरसन यांच्या जागी अाता सीअायएचे संचालक माइक पाेंपियाे परराष्ट्रमंत्री असतील. तसेच सीअायएच्या संचालकपदावर प्रथमच एका महिलेची नियुक्ती करण्यात अाली असून, उपसंचालक असलेल्या जीना हाॅस्पेल अाता सीअायएचे संचालकपद सांभाळतील.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now