चालू घडामोडी – १५ एप्रिल २०१६
देश-विदेश
‘एनएसजी’मध्ये भारताच्या प्रवेशाला चीनकडून प्रतिबंध
अणुपुरवठादार गटामध्ये (एनएसजी) सहभागी होण्याचे भारताचे प्रयत्न असून त्यासाठी अमेरिकेचा भारताला पाठिंबा असला तरी चीन भारताचा या गटात प्रवेश होऊ देणार नाही, असा विश्वास पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. स्ट्रॅटजिक व्हिजन इन्स्टिटय़ूट (एसव्हीआय) आणि कॉनरड अडेनेऊर स्टिफटंग यांनी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय अणुकार्यक्रमावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात सहभागी होताना पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रसंघातील माजी कायम प्रतिनिधी झमीर अक्रम यांनी वरील विश्वास व्यक्त केला. chalu ghadamodi 2016
महाराष्ट्र
व्याघ्र संरक्षण दलासाठी राज्याची केंद्राकडे साहाय्याची मागणी
व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने १०० टक्के आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्राकडून पूर्ण आर्थिक साहाय्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात व्याघ्र संशोधन केंद्र उभारण्यासाठी आर्थिक सहकार्य करावे आणि ताडोबा व्याघ्र संवर्धन प्रकल्पावर टपाल तिकीट काढावे या मागण्याही मुनगंटीवार यांनी केल्या आहेत. आम्ही १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प हाती घेतला, प्रथम नऊ व्याघ्र अभयारण्ये होती ती आता ४९ इतकी झाली असून त्याची व्यप्ती वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.chalu ghadamodi in marathi
अर्थव्यवस्था
‘इन्फोसिस’ला चौथ्या तिमाहीत ३५९७ कोटींचा नफा
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील बलाढ्य कंपनी ‘इन्फोसिस’ने नुकत्याच संपलेल्या चौथ्या तिमाहीमध्ये ३५९७ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीने केलेल्या कामगिरीची माहिती शुक्रवारी देण्यात आली. चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीचा एकत्रित नफा ३५९७ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. गेल्यावर्षी ३१ मार्चला संपलेल्या तिमाहीमध्ये हाच नफा ३०९७ कोटी रुपये इतका होता. गेल्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीमधील एकत्रित नफ्यामध्ये ३.८१ टक्के इतकी वाढ झाली असल्याचे कंपनीचे सीईओ विशाल सिक्का यांनी सांगितले. तिसऱ्या तिमाहीमध्ये इन्फोसिसने ३४६५ कोटी रुपयांचा नफा कमावला होता.free chalu ghadamodi app
बंदर क्षेत्रात एक लाख कोटीची गुंतवणूक
भारताला लाभलेला ७,५०० किलो मीटरहून अधिकच्या सागरी किनाऱ्याद्वारे तयार होणारा सागरीमाला प्रकल्प हा देशाच्या विकासवाढीतील महत्त्वाचे योगदान ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या क्षेत्रात येत्या दशकभरात एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबतचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.भारतीय नौवहन मंत्रालयातर्फे आयोजित तीन दिवसांच्या सागरी परिषदेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.chalu ghadamodi for mpsc
नादिर गोदरेज यांना जीवनगौरव पुरस्कार
गोदरेज इंडस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक नादिर गोदरेज यांना नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया लिक्विड बल्क इम्पोर्टर्स अँड एक्स्पोर्टर्स असोसिएशन (एआयएलबीआयईए)च्या शानदार समारंभात जीवनगौरव पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.chalu ghadamodi for police bharati
क्रीडा
भारताचे आव्हान संपुष्टात
पी. व्ही. सिंधूसह दुहेरी प्रकारातील खेळाडूंच्या पराभवामुळे सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.chalu ghadamdi current affairs
सौम्यजित, मनिका आॅलिंपिकला पात्र
सौम्यजित घोष आणि मनिका बात्राने दक्षिण आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धा जिंकत रिओचे तिकीट पक्के केले. मनिकाला हरवल्यानंतर तोच धडाका कायम न राखल्यामुळे पूजा सहस्रबुद्धेचा ऑलिंपिक पात्रतेचा मार्ग जास्त खडतर झाला. chalu ghadamodi website