साहित्य अकादमी पुरस्कार: कवी सुशीलकुमार शिंदे, सलीम मुल्ला यांचा गौरव
- साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. मराठी भाषेसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला यंदाचा युवा साहित्य पुरस्कार मिळाला असून सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीसाठी बालसाहित्य पुरस्कार देण्यात आला आहे.
- साहित्य अकादमीने २२ भाषांमधील युवा साहित्यिकांच्या ११ काव्यसंग्रह, सहा कथा, पाच कांदबऱ्या आणि एका समीक्षेची पुरस्कारासाठी निवड केली. या वर्षी युवा साहित्यात कवितांचा अधिक प्रभावी ठरल्या. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या कार्यकारी समितीने पुरस्कारांना संमती दिली. युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार पन्नास हजार रुपयांचा आहे. ३५ वर्षांच्या आतील साहित्यिकांसाठी युवा पुरस्कार दिला जातो. फक्त मैथिली भाषेतील पुरस्कार जाहीर झालेले नाहीत.
फोर्ब्सच्या यादीत 57 भारतीय कंपन्यांना स्थान; रिलायन्स 71 व्या क्रमांकावर
- जगभरातील 2000 मोठ्या कंपन्यांच्या यांदीत भारतातील 57 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत स्थान देण्यात आले असून पहिल्या 200 कंपन्यांमध्ये ही एकमेव भारतीय कंपनी आहे. फोर्ब्सच्या नुकतीच एक यादी जाहीर केली आहे.
- फोर्ब्सच्या जागतिक 2000 कंपन्यांच्या यावर्षीच्या यादीत चीनच्या इंडस्ट्रियल अँड कॉमर्शियल बँक ऑफ चायनाला (आयसीबीसी) पहिले स्थान देण्यात आले आहे. आयसीबीसी सलग सातव्यांदा फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत रियालंस इंडस्ट्रीज या एकमेव कंपनीला या यादीत स्थान देण्यात आले आहे.
- पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज 11 व्या स्थानावर आहे. तर रॉयल डच शेलला पहिले स्थान देण्यात आले आहे.
- पहिल्या 2000 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक 209 वे, ओएनजीसी 220 वे, इंडियन ऑईल 288 वे आणि एचडीएफसी लिमिटेड 332 वे स्थान देण्यात आले आहे.
TOP 5: मुंबई जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर, दिल्ली चौथ्या स्थानी
- भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसोंदिवस वाढतानाच दिसत आहे. मात्र जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांची यादी नुकतीच एका कंपनीने जाहीर केली. या यादीमधील पहिले नाव ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल. या यादीनुसार जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीत मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर आहे.
- अॅपल आणि उबर या कंपन्यांना लोकेशन्स पुरवण्याचे काम करणाऱ्या टॉमटॉम या कंपनीने जगभरातील ५६ मोठ्या देशांचा अभ्यास करुन एक अहवाल सादर केला आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमधील मोठ्या शहरांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा किती टक्के अधिक वेळ लागतो हे या अहवालात सांगण्यात आले आहे.
स्वतःच्या अंतराळ स्थानक निर्मितीची भारताची योजना : इस्रो
- महत्वाकांक्षी चांद्रयान-२ चे काऊंडाऊन सुरु झाल्यानंतर अवकाश संशोधनामध्ये भारत आता भविष्यातही आणखी महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी म्हटले आहे.
महान बॅडमिंटनपटू ली च्योंग वेईची निवृत्तीची घोषणा
- कर्करोगामुळे आजारी असणारा महान बॅडमिंटनपटू ली च्योंग वेईने गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली. लीने अनेक पारितोषिके जिंकली आहेत, परंतु जागतिक किंवा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकू शकला नाही.
- जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर ली एकूण ३४८ आठवडे विराजमान होता. परंतु सहा जागतिक आणि तीन ऑलिम्पिक स्पर्धाच्या अंतिम फेरीत पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कर्करोगाचे निदान झाल्यावर महिन्याभरातच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.
‘जनगणना’ संकलन ऑनलाइन
- देशात सन २०२१मध्ये होणाऱ्या जनगणनेत माहितीचे संकलन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. जनगणनेसाठी माहिती संकलनाच्या पद्धतीत क्रांतिकारक बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. यासाठीच्या सर्व टप्प्यांची चाचणी (रंगीत तालीम) ऑगस्ट ते सप्टेंबर, २०१९दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये होणार आहे.
- भारताचे महानिबंधक तथा जनगणना आयुक्तांच्या कार्यालयामार्फत देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच ‘जनगणना-२०२१’ची तयारी सुरू झाली आहे.