⁠  ⁠

Current Affairs – 15 October 2018

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

उत्तर प्रदेशातील ‘अलाहाबाद’ शहर आता ‘प्रयागराज’
नावाने ओळखले जाणार

  • उत्तर प्रदेशात आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. याची जोरदार तयारी सुरु असून या कुंभमेळ्यापूर्वीच अलाहाबाद शहराचे नामकरण प्रयागराज करण्यासाठी सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत.
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कुंभमेळ्याच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली, यावेळी त्यांनी अलाहाबादच्या नामकरणाची घोषणा केली.
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत अलाहाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्यपाल राम नाईक यांनी देखील यापूर्वीच सहमती दर्शवली होती. त्यानंतर शनिवारी कुंभमेळा मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

september mpsc ebook

रेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार

  • महिलांची छळवणूक, चोरी, दरोडे यांबाबतच्या तक्रारी मोबाइल उपयोजनाच्या माध्यमातून घेण्यास मध्य प्रदेशातील पथदर्शक प्रकल्पात सुरुवात करण्यात आली असून त्याची पुनरावृत्ती सगळ्या देशात केली जाणार आहे. आता प्रवाशांना तक्रार दाखल करण्यासाठी पुढचे स्थानक येण्याची वाट पाहावी लागणार नाही. ते मोबाइल उपयोजनाच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतील, त्यानंतर लगेच रेल्वे पोलिस त्याची चौकशी सुरू करतील. अशी माहिती रेल्वे पोलिस दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली.
  • या तक्रारीला झीरो एफआयआर म्हटले जाते. त्यात लगेच चौकशी सुरू केली जाईल. ज्या हद्दीत गुन्हा घडला तेथे तक्रार दाखल न करता दुसरीकडे कुठेही दाखल केलेली तक्रार ही झीरो एफआयआर गणली जाते ती नोंदवून घेतल्यानंतर संबंधित पोलिस स्टेशनकडे पाठवली जाते. यात पोलिस हद्दीचा वाद आणू शकत नाहीत.

telegram ad 728

पेसची वर्षांतील दुसऱ्या विजेतेपदास गवसणी

  • मेक्सिकन सहकारी मिगुएल अँजेल रेईस व्हॅरेलासह पेसने सँटो डोमिंगो खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. पेसचे हे वर्षांतील दुसरे विजेतेपद ठरले.
  • न्यूपोर्ट खुल्या टेनिस स्पर्धेत मिळवलेले विजेतेपद पेसचे वर्षांतील पहिले विजेतेपद होते.
  • याशिवाय पेसने या वर्षी शिकागो, डलास चॅलेंजर टेनिस स्पर्धा, विन्स्टन सालेम खुली टेनिस स्पर्धा, दुबई फ्री टेनिस अिजक्यपद स्पर्धा यांसारख्या अनेक स्पर्धामध्ये मिश्र व पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीमध्येही प्रवेश मिळवला होता, पण प्रत्येक वेळी त्याला विजेतेपदाने हुलकावणी दिली.

IND vs WI : भारताची विंडीजवर १० गडी राखून मात;
मालिकेवर निर्विवाद वर्चस्व

  • IND vs WI : विंडीजविरुद्धची दुसरी कसोटी भारताने १० गडी राखून जिंकली. उमेश यादवचा भेदक मारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे – ऋषभ पंत जोडीची भागीदारी याच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिका २-० अशी जिंकली. विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत आटोपल्यानंतर भारताने ७२ धावांचे अंतिम लक्ष्य एकही बळी न गमावता पूर्ण केले. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने आणि लोकेश राहुल धावा केल्या.
  • १० बळी टिपणाऱ्या उमेश यादवला सामनावीर तर पृथ्वी शॉला मालिकावीर घोषित करण्यात आले.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Share This Article