चालू घडामोडी – १६ एप्रिल २०१६
देश-विदेश
देशात परदेशी विद्यापीठांच्या स्थापनेला परवानगी मिळणार
भारतात परदेशी विद्यापीठांच्या स्थापनेचा मार्ग लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. नीती आयोगाने यासंदर्भातील अहवाल पंतप्रधान कार्यालय आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयालाकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आगामी काळात परदेशी विद्यापीठांना भारतीय शिक्षणक्षेत्रात शिरकाव करण्याची संधी मिळणार आहे. युपीए सरकारच्या कार्यकाळात या प्रस्तावाला भाजपने विरोध दर्शविला होता.
दिल्लीत ‘सम-विषम’चा दुसरा टप्पा सुरु
नवी दिल्लीत सम-विषम वाहने आलटून पालटून रस्त्यावर आणण्यासाठीची योजना पुन्हा सुरू झाली असून, अगदी कमी खासगी मोटारी रस्त्यावर दिसून आल्या. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही योजना दुसऱ्यांदा अमलात आणली आहे. आज पहिल्याच दिवशी दुपापर्यंत ५११ जणांना दंड करण्यात आला. हजारो पोलीस व नागरी संरक्षण स्वयंसेवक विविध भागांत तैनात करण्यात आले होते. ही योजना पंधरा दिवस म्हणजे ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
क्रीडा
अझलन शाह हॉकीमध्ये भारताला उपविजेतेपद
इपोह : प्रतिष्ठेच्या अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये खेळ उंचावण्यात भारताला अपयश आल्याने अखेरीस उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाने सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच भारतीय संघावर वर्चस्व राखले आणि 4-0 असा दणदणीत विजय मिळविला.chalu ghadamodi 2016
अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची अवस्था म्हणजे ‘वासरात लंगडी गाय शहाणी’
सद्यस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण असल्याच्या चर्चा झडत असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन ‘वासरात लंगडी गाय शहाणी'(one-eyed’ king in land of blind), असे केले आहे. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक संस्थांकडून भारत गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण असल्याचे प्रशस्तिपत्र देण्यात आले होते. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावरील नकारात्मक धक्क्यांपासून वाचवल्याबद्दल राजन यांचेही अनेक जागतिक संस्थांकडून कौतूक करण्यात आले होते.chalu ghadamodi app
महाराष्ट्राचे ११ हजार कोटींचे करार
पहिल्या भारतीय सागरी परिषदेचे यजमानपद भूषविणाऱ्या महाराष्ट्राने ७५० किलो मीटरच्या सागरी किनाऱ्याशी निगडित ११,००० कोटी रुपयांचे करार शुक्रवारी केले. राज्य शासनाच्या मेरिटाईम मंडळाने बंदर व माल वाहतूक क्षेत्रातील विविध करार परिषदेच्या मंचावर पार पाडले. ११,०३९ कोटी रुपयांपैकी सर्वाधिक, ७,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक ही मानखुर्द (मुंबई) येथील योगायतन समूहामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या जेटीकरिता आहे.chalu ghadamodi in marathi