भारताकडून सब-सॉनिक निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
- भारताने निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे पहिले सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावरील चांदीपूर येथील चाचणी तळावरून निर्भयची चाचणी घेण्यात आली. निर्भयच्या चाचणीमुळे भारताची मारक क्षमता वाढणार आहे.
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. डीआरडीओच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, विविध प्लॅटफॉर्मवर तैनात करण्याची क्षमता असलेले हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र चाचणी संकुल-३ वरून सकाळी ११.४४ वा. सोडण्यात आले. ४२ मिनिटे २३ सेकंदांत त्याने आपले लक्ष्य भेदले.
भारताची निर्यात व्यापारात ३३१ अब्ज डॉलरपर्यंत झेप
- केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील निर्यातीबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. भारताने निर्यात व्यापारात दमदार कामगिरी केल्याचे समोर आले आहे. सरत्या आर्थिक वर्षात निर्यातीत ९ टक्के वाढ वाढ झाली असून ३३१ अब्ज डॉलरपर्यंत व्यापार पोहचला आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये नोंदवण्यात आलेल्या निर्यातीचा विक्रम यंदा मोडीत निघाला आहे.
- आर्थिक मंदीच्या वातावरणात २०१८-१९ या वर्षात ३३१ अब्ज डॉलर व्यापाराची नोंद करण्यात आली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. मार्च महिन्यात निर्यात व्यापारात ११ टक्के वाढ झाली. ऑक्टोबर २०१८ नंतर एका महिन्यात सर्वाधिक मोठी वाढ मार्चमध्ये नोंदवण्यात आली. ऑक्टोबरमध्ये १७.८६ टक्के वाढ नोंदवण्यात आली. फार्मा, केमिकल, अभियांत्रिकी क्षेत्रातील वाढीमुळे एकूण निर्यात व्यापारात वाढ झाली आहे.
चीनचा पहिला ‘मरिन लिझार्ड’ ड्रोन
- समुद्र आणि जमिनीवर काम करू शकणारे जगातील पहिली ‘अॅम्फिबिअस ड्रोन बोट’ चीनने तयार केली आहे. ‘मरिन लिझार्ड’ असे नाव चीनने या ड्रोनला दिले असून, त्याचे नियंत्रण थेट उपग्रहांद्वारे होणार आहे.
- जमिनीवरील हल्ले; तसेच हवाई ड्रोन आणि जहाजांवरील ड्रोनचा वापर करून लढाऊ त्रिकुट तयार करण्याची याची क्षमता आहे
- ‘चीन जहाजबांधणी उद्योग निगम’ अंतर्गत वुचांग जहाजबांधणी उद्योग समूहाने या ड्रोन बोटची निर्मिती केली आहे. या ड्रोनने सर्व चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत. ‘मरिन लिझार्ड’ असे नाव याला दिले आहे.
- ड्रोनशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले, की या ड्रोनचा कार्यक्षमतेचा पल्ला १२०० किलोमीटर असून याचे नियंत्रण उपग्रहांद्वारे केले जाणार आहे.
- ‘मरिन लिझार्ड’ बोटीच्या आकाराचे असून लांबी १२ मीटर आहे. डिझेलवर चालणाऱ्या हायड्रोजेटवर ड्रोन चालत असून समुद्रामध्ये जास्तीत जास्त ५० नॉट वेग हा ड्रोन गाठू शकतो.
दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप गुप्ते
- दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी मूळ सातारा शहराचे रहिवासी असलेल्या संदीप सुधाकर गुप्ते यांची निवड करण्यात आली आहे.
- दुबई, युएई येथे 47 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि मराठी मनांची अस्मिता मानल्या जाणार्या आपल्या पुढील पिढीसाठी आपली
महाराष्ट्रीयन संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवणे, जोपासणे आणि वृध्दींगत करणे. - मायबोली मराठीचा उज्वल आणि गौरवशाली वारसा जपणे. दुबई, युएई मधील मराठी माणसांना एकत्रित ठेवून आपली उज्वल संस्कृती
आणि परंपरा परदेशातही टिकवून ठेवण्याचे कार्य दुबई महाराष्ट्र मंडळाकडून सातत्याने केले जात असते. - तर याच मंडळाच्या अध्यक्षपदावर सातारा शहरातील मंगळवार पेठेतील संदीप गुप्ते यांची निवड झाली आहे. साताऱ्यात शिक्षण घेतलेले
- संदीप गुप्ते हे उच्चशिक्षणानंतर नोकरीनिमीत्त दुबईमध्ये स्थायिक झाले.
दुबईतील एका कंपनीत ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे संदीप गुप्ते यांनी गेली 24 वर्ष विविध आखाती देशांमध्ये मराठी
सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केले आहे.
यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर
- मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे संगीत, नाटय़, कला आणि सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे मास्टर दीनानाथ पुरस्कार जाहीर करण्यात आले.
- प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांना या वर्षीचा संगीत आणि कला क्षेत्रातील मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात येणार असून मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना प्रदान करण्यात येणार आहे.
- प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून दरवर्षी दिले जाणारे हे पुरस्कार या वर्षी 24 एप्रिल रोजी मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात प्रदान करण्यात येतील.
‘सीआरपीएफ’चे महासंचालक विजयकुमार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या वर्षीच्या विजेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.
भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिग्दर्शक मधुर भांडारकर - यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.