1) भारताच्या 6 निर्यात सबसिडी योजनांना अमेरिकेचे आव्हान
अमेरिकेने भारताच्या निर्यात सबसिडी योजनांना जागतिक व्यापार संघठनेत(डब्लूटीओ) आव्हान दिले आहे. अमेरिकेने केलेल्या तक्रारीत या सहा योजनांचा उल्लेख केला आहे. त्यात म्हटले की, भारत निर्यातदारांशिवाय स्टील उत्पादन,औषधी, रसायन, माहिती तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, कपडे निर्यातदारांना कर व अन्य प्रकारे प्रोत्साहन देतो. या योजनांच्या माध्यमातून दरवर्षी ७ अब्ज डॉलरची(४५,५०० कोटी रु.) मदत मिळते. या मदतीतून निर्यातदार आपले साहित्य स्वस्तात निर्यात करतो. यामुळे अमेरिकी उत्पादक व कामगारांचे नुकसान होते. स्पर्धेत भारतीय व्यावसायिकांना लाभ होतो.
या सहा योजनांवर अमेरिकेचा आक्षेप
१. मर्केंडाइज एक्सपोर्ट््स फ्रॉम इंडिया स्कीम
२. एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स स्कीम
३. इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स स्कीम
४. स्पेशल इकॉनॉमिक झोन
५. एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स स्कीम
६. ड्युटी-फ्री इंपोर्ट््स फॉर एक्सपोर्टर्स प्रोग्राम
2) पेमेंट आॅफ ग्रॅच्युटी अॅमेडमेंट बिल आणि स्पेसिफिक रिलिफ अॅमेंडमेंट बिल मंजूर
पेमेंट आॅफ ग्रॅच्युटी अॅमेडमेंट बिल आणि स्पेसिफिक रिलिफ अॅमेंडमेंट बिल या दोन महत्वपूर्ण बिलांना लोकसभेत गुरुवारी मंजूरी मिळाली आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणा-या कर्मचा-याला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त ग्रॅच्युटी दिली जाऊ शकत नाही अशी तरतूद पेमेंट आॅफ ग्रॅच्युटी अॅक्टमध्ये होती. यात सुधारणा केल्यानंतर आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना 20 लांखापर्यंत टॅक्स फ्रि ग्रॅच्युटी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचा-यांना पहिल्यापासूनच 20 लाख रुपये टॅक्स फ्रि ग्रॅच्युटीची तरतूद केली गेली आहे. हे बिल पास झाल्यामुळे आत्ता सरकारच एखाद्या कर्मचा-याला जास्तीत जास्त किती मॅटरनिटी लिव्ह दिली जाऊ शकते हे निश्चित करु शकणार आहे. 1991 च्या कायद्याने जास्तीत जास्त मॅटरनिटी लिव्ह या मॅटरनिटी बेनिफिट अॅमेडमेंट अॅक्ट 2017 च्या माध्यमातून 12 एेवजी 26 आठवड्यांपर्यंत वाढवली होती. आता या बिलानुसार केंद्र सरकार जास्तीत जास्त मॅटरनिटी लिव्हची संख्या निश्चित करु शकते.
3) देशात 20, तर 5 खंडांतील 30 शहरांत पुलोत्सव
८ नोव्हेंबर २०१८ पासून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्रात साजरा होणारा ‘पुलोत्सव’ आता राज्याबाहेरील शहरांत आणि जगभरातील पाच खंडांतील ३० शहरांतून साजरा होणार आहे. आशय सांस्कृतिक, पुल परिवार आणि पुण्यभूषण फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने पुलंचे जन्मशताब्दी वर्ष राज्यात पुणे, मुंबईसह औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, नगर, जळगाव, अमरावती या शहरांतही पुलोत्सव होणार आहे. युरोप, आशिया, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे साजरे केले जाणार आहे. दर्जेदार प्रकाशने, लघुपट प्रदर्शन केले जाईल. पुलंचे आजही अप्रकाशित असणारे लेखन व अन्य कार्य रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. बैठकीची लावणी, कवितावाचन, अभिवाचन, अनुवाद, रवींद्रनाथ..आदी सादरीकरणांचा त्यात समावेश असेल.
4) दिनाकरन यांनी जयललितांच्या नावाने केली पक्षाची स्थापना
तामिळनाडूच्या राजकारणात अण्णाद्रमुकचे बंडखोर नेते आणि भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात असलेल्या व्ही.के. शशिकला यांचे पुतणे टीटीव्ही दिनाकरन यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. अम्मा मक्कल मुनेत्र कझघम असे या पक्षाचे नाव घोषित करण्यात आले आहे. या पक्षाचे निवडणूक चिन्ह दोन पानाचेच असेल. माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या नावावरुन ठेवले आहे. एएमएमके यावर्षी तमिळनाडूमध्ये लाँच झालेला दुसरा पक्ष आहे. यापूर्वी तमिळ सुपर स्टार कमल हासनने 21 फेब्रुवारीला मक्कल नीति मय्यम (एमएनएम) नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्याचा अर्थ जन न्याय केंद्र असा होतो. दुसरीकडे सुपरस्टार रजनीकांतही लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. पण अद्याप त्याची तारीख स्पष्ट झालेली नाही.
5) दहावीच्या परीक्षेत विराट कोहलीवर दहा गुणांचा प्रश्न
कोलकातामध्ये सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. बोर्ड परीक्षेमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीवर प्रश्न विचारण्यात आला. इंग्रजीच्या पेपरमध्ये विराट कोहलीवर निबंध लिहायला सांगितले. या प्रश्नासाठी दहा गुण देण्यात आले आहेत. 2017 मध्ये 29 वर्षीय विराट कोहलीने आयसीसीचा मानाचा क्रिकेटर ऑफ द ईयर हा खिताब पटकावला होता. कसोटीमध्ये 21 आणि वन-डेमध्ये 35 शतकेही कोहलीच्या नावावर आहेत. सध्या श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-20 मालिकेतून त्यानं माघार घेतली असली तरीही तो चर्चेत आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.