चालू घडामोडी : १६ मार्च २०२०
Current Affairs 16 March 2020
खनिज कायदे दुरुस्ती विधेयक, २०२० ला सरकारची मंजुरी
खनिज कायदा दुरुस्ती विधेयक २०२० ला संसदेने मंजुरी दिली आहे. तसेच कोळसा खाणींचे क्षेत्र देशांतर्गत आणि जागतिक खाण उद्योग कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. राज्यसभेत खनिज कायदे (दुरुस्ती) विधेयक (Mineral Laws Amendment Bill ) ८३ विरुद्ध १२ अशा मतांच्या फरकाने मंजूर करण्यात आले.
आता नवा खनिज दुरुस्ती कायदा कोळसा आणि खाण क्षेत्रात अधिक परकीय गुंतवणूक आणण्यास आणि अर्थव्यवस्थेस चालना देण्यास मदत करेल, असे कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
भारतात २.७ लाख कोटी रुपयांच्या कोळशाची आयात करण्याऐवजी देशाने आपला नैसर्गिक साठा वापरला पाहिजे. आपल्याला कोळसा निर्मिती करावी लागेल आणि कोळशाची आयात कमी करावी लागेल.
लक्झेंबर्ग ठरला सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला देश
सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला देश लक्झेंबर्ग ठरला आहे. युरोपमधील क्षेत्रफळानुसार ७ वा छोटा देश लक्झेंबर्ग आहे.
पर्यावरणाच्या प्रश्नाकडे सजगपणे लक्ष देण्याच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठळक बाबी
ट्रेन, ट्राम आणि बसचे भाडे रद्द करण्यात आले आहे
लक्झेंबर्गमध्ये अर्ध्याहून अधिक हरितगृह वायू ऊत्सर्जन वाहतुकीच्या माध्यमातून होते ही ठळक बाब आहे
व्हिक्टर विजेता; २१ वर्षांनंतर डेन्मार्कचा खेळाडू चॅम्पियन
गत वेळच्या उपविजेत्या व्हिक्टर एक्सेलसनने अापल्या अव्वल खेळीच्या बळावर अाॅल इंग्लंड अाेपनचा किताब पटकावला. त्याने रविवारी पुरुष एकेरीच्या गटात चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. यासह अाता व्हिक्टर हा २१ वर्षांनंतर अाॅल इंग्लंड अाेपनचे विजेतेपद जिंकणारा डेन्मार्कचा पहिला बॅडमिंटनपटू ठरला.
डेन्मार्कच्या या २६ वर्षीय बॅडमिंटनपटूने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये अव्वल मानांकित चाेऊला पराभूत केले. त्याने ४६ मिनिटांत २१-१३, २१-१४ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंेद केली. यासह ताे किताबाचा मानकरी ठरला. यापूर्वी १९९९ मध्ये डेन्मार्कचा पीटर हा या किताबाचा मानकरी ठरला हाेता. अाता व्हिक्टरने हा बहुमान पटकावला.
इंडियन सुपर लीग फुटबॉल : अॅटलेटिको डे कोलकाताला तिसरे विजेतेपद
अॅटलेटिको डे कोलकाताने (एटीके) अंतिम फेरीत अपेक्षेप्रमाणे चेन्नईयन एफसीचा ३-१ असा पाडाव करत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या तिसऱ्या विजेतेपदाला गवसणी घातली.
जेवियर हेर्नाडेझ (१०व्या आणि ९३व्या मिनिटाला) तसेच इडू गार्सिया (४८व्या मिनिटाला) यांनी केलेले गोल एटीकेच्या विजयात मोलाचे ठरले.
एटीकेने हेर्नाडेझच्या गोलमुळे पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर गार्सियाने गोल करत ही आघाडी वाढवली. पण वालस्किसच्या गोलमुळे चेन्नईयनने सामन्यात पुनरागमन केले. अतिरिक्त वेळेत हेर्नाडेझने दुसरा गोल करत एटीकेच्या विजयावर मोहोर उमटवली.