---Advertisement---

Current Affairs – 16 September 2018

By Rajat Bhole

Updated On:

swachhta-hi-seva-narendra-modi
---Advertisement---

देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ

  • देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व अन्य केंद्रीय मंत्री हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले. अभियानापूर्वी नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थी व देशातील मान्यवर व्यक्तींशी संवाद साधला.
  • ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत राबवले जाणार आहे. या अभियानाचा नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शुभारंभ केला. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिग द्वारे संवाद साधला. मोदी म्हणाले, देशातील सर्वच स्तरातील लोकांनी व स्वच्छता प्रे‍मींनी सक्रिय सहभाग नोंदविल्यामुळे ‘स्वच्छ भारत मिशन’ यशस्वी होऊ शकले. या अभियानात ज्या स्वच्छाग्रहींनी सहभाग नोंदविला, त्यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

वीज दरवाढीचा ‘महाधक्का’

  • महावितरणला तूर्तास आठ हजार २६८ कोटी रुपयांची दरवाढ मंजूर करताना राज्य वीज नियामक आयोगाने १२ हजार ३८२ कोटींची दरवाढ प्रलंबित ठेवली आहे. ती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर म्हणजेच २०२० मध्ये लागू केली जाईल.

telegram ad 728

SAFF Cup: भारताचे स्वप्न भंगले, मालदीवने केला २- १ ने पराभव

  • दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ) चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मालदीवने भारताचा २- १ ने पराभव करत चषकावर नाव कोरले. मालदीववर मात करत आठव्यांदा विजेतेपद पटकावण्याचे भारताचे स्वप्न अखेर भंगले आहे.
  • सॅफ चषकात अपराजित वाटचाल करणाऱ्या भारताचा अंतिम सामन्यात मालदीवशी सामना होता. भारताने गटसाखळीत श्रीलंकेचा २-० आणि मालदीवचा २-० असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत पाकिस्तानला ३-१ असे हरवून अंतिम फेरी गाठली.आतापर्यंत झालेल्या ११ स्पर्धामध्ये सात विजेतेपदांवर भारताने नाव कोरले. अंतिम सामन्यात मालदीववर मात करत सलग तिसरे विजेतेपद आणि सॅफ चषकावर आठव्यांदा नाव कोरण्यास भारतीय संघ उत्सुक होता.

मुंबई मॅरेथॉनच्या शिरपेचात मानाचा तुरा, मिळाला Gold Lable चा दर्जा

  • प्रत्येक नवीन वर्षाच्या सुरुवातीला पार पडल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. IAAF म्हणजेच आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडरेशनने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला Gold Lable हा दर्जा दिला आहे. २० जानेवारी २०१९ रोजी मुंबई मॅरेथॉनचं १६ वं पर्व पार पडलं जाणार आहे. तब्बल ४६ हजार स्पर्धक या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
  • कोणत्याही मॅरेथॉन स्पर्धेला Gold Lable चा दर्जा देत असताना IAAF चे काही निकष ठरवले गेलेले असतात. स्पर्धेचं एकंदरीत नियोजन, धावपटूंसाठीच्या केलेल्या सोयी-सुविधा, स्त्री-पुरुष विजेत्यांना मिळणारी बक्षिसाची रक्कम, वैद्यकीय सुविधा, स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, प्रसारमाध्यमांमध्ये होणारी चर्चा यावरुन IAAF स्पर्धेला Gold Lable चा दर्जा प्रदान करत असते. मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी सर्व निकषांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर हा दर्जा देण्यात आल्याचं स्पर्धेच्या आयोजकांनी स्पष्ट केलं.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now