चालू घडामोडी – १७ मार्च २०१६
देश-विदेश
सर अँड्रय़ू वाइल्स यांना ‘आबेल’ पुरस्कार
ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक सर अँड्रय़ू वाइल्स यांनी तीनशे वर्षे गूढ बनून राहिलेला एक कूटप्रश्न सोडवला असून त्यांना त्यासाठी गणितातील नोबेल मानला जाणारा आबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार ५ लाख पौंडाचा आहे. नॉर्वे विज्ञान व साहित्य अकादमीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. १९९४ मध्ये वाइल्स यांनी फेरमॅटच्या शेवटच्या सिद्धांताचे पुरावे दिले असून तो सिद्ध केला आहे.current affairs for mpsc exam in marathi
नरेंद्र मोदी इंटरनेटवरील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या यादीत
टाईम नियतकालिकातर्फे जाहीर करण्यात आलेल्या इंटरनेटवरील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलग दुसऱ्यांदा समावेश करण्यात आला आहे. ट्विटर आणि फेसबुक यांसारख्या समाज माध्यमांवर असलेली मोदींची लोकप्रिय पाहता ‘टाईम’ने त्यांचा उल्लेख ‘इंटरनेट स्टार’ असा केला आहे. सध्या ट्विटरवर मोदींचे १८ लाख फॉलोअर्स आहेत तर, त्यांच्या फेसबुक पेजलाही ३२ लाख लाईक्स आहेत. त्यामुळेच ‘टाईम’कडून मोदींचा इंटरनेटवरील ३० प्रभावी लोकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
‘आधार’ विधेयक लोकसभेत मंजूर
राज्यसभेने सुचविलेल्या पाच सुधारणा आणि घाईगडबडीत निर्णय न घेण्याची विरोधकांची विनंती फेटाळून बुधवारी, १६ मार्च २०१६ रोजी लोकसभेत आधार विधेयक मंजूर करण्यात आले. वरिष्ठ सभागृहाने सुचविलेल्या पाच सुधारणा फेटाळून लोकसभेत आधार विधेयक २०१६ आवाजी मतदानाने मंजूर केले. त्यानंतर लोकसभेचे कामकाज २५ एप्रिलपर्यंत तहकूब केल्याची घोषणा करण्यात आली.chalu ghadamodi 2016
ज्येष्ठ शहनाईवादक अली अहमद हुसेन खान यांचे निधन
प्रख्यात शहनाईवादक उस्ताद अली अहमद हुसेन खान यांचे बुधवारी, १६ मार्च २०१६ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्यानंतरचे प्रख्यात शहनाईवादक म्हणून अली अहमद हुसेन खान यांचा लौकिक होता. बनारस शहनाई संगीत घराण्याशी संबंधित असलेले अली खान यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २००९ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. बनारसमध्ये शहनाईवादकांच्या घराण्यात जन्मलेले अली खान यांचे शास्त्रीय आणि निमशास्त्रीय संगीतावर प्रभुत्व होते.chalu ghadamodi for mpsc in marathi
अर्थव्यवस्था
टाटा समूहाची संरक्षण सज्जता
केंद्र सरकारची ‘मेक इन इंडिया’ मोहीम तसेच निर्णयांना गती देण्याच्या धोरणामुळे देशातील संरक्षण क्षेत्रातील योगदान वाढविण्याविषयीचा आशावाद टाटा समूहाने व्यक्त केला आहे. विविध १० कंपन्यांमार्फत संरक्षण क्षेत्रात अस्तित्व राखलेल्या समूहाने चालू आर्थिक वर्षांत या गटात १०,००० कोटी रुपयांची कंत्राटे मिळविण्याचे उद्दिष्ट राखले आहे. विद्युत उपकरणे, तंत्रज्ञान तसेच अवजड वाहने पुरविणे आदींमार्फत १९५८ पासून देशाच्या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या टाटा समूहाचे येत्या पंधरवडय़ात संपणाऱ्या २०१५-१६ या आर्थिक वर्षांत वार्षिक ७.५ टक्के दराने (२,६५० कोटी रुपये महसुली उत्पन्न) वृद्धी गाठण्याबाबतचा विश्वास टाटा सन्सच्या समूह कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. मुकुंद राजन यांनी व्यक्त केला.mpsc guidance in marathi
‘सीआयआय’ पश्चिम क्षेत्राच्या अध्यक्षपदी सुधीर मेहता
भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून सुधीर मेहता यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी निनाद कर्पे नियुक्त झाले आहेत. ही नियुक्ती २०१६-१७ या वर्षांसाठी आहे. नवे अध्यक्ष मेहता हे पिनॅकल इंडस्ट्रीज या व्यापारी वाहनांच्या सहयोगी व्यवसाय कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. फोर्स मोटर्स, मॅन फोर्स ट्रक्स, एमेसा एलिव्हेटर कंपोनंट्स या कंपन्यांच्या संचालक मंडळावर ते कार्यरत आहेत. तर नवे उपाध्यक्ष निनाद करपे हे अॅप्टेकचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. महासंघाच्या शिक्षणविषयक परिषदेचे ते अध्यक्ष राहिले आहेत.best mpsc classes in pune
क्रीडा
रॅफेल नदालची व्हरडॅस्कोवर मात
इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया – स्पेनच्या रॅफेल नदालने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत देशबांधव फर्नांडो व्हरडॅस्कोवर ६-०, ७-६ (११-९) अशी मात केली. नदालच्या खेळात चढ-उतार झाले तरी हा विजय महत्त्वाचा ठरला.unique acadamy in pune