चालू घडामोडी : १७ नोव्हेंबर २०२०
Current Affairs : 17 November 2020
नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री
बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ पैकी १२५ जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते व संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी सोमवारी बिहारचे ३७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मागील दोन दशकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ही त्यांची सातवी वेळ आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून भाजप नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी शपथ घेतली.
अरुणाचल प्रदेशात सर्वोत्तम स्त्री-पुरुष प्रमाण
‘व्हाईटल स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया बेस्ड ऑन द सिविल रजिस्ट्रेशन सिस्टम’ अहवालात दिलेल्या आकडेवारीमधून असे दिसून आले आहे की, अरुणाचल प्रदेशात सर्वोत्तम स्त्री-पुरुष प्रमाणाची नोंद झाली आहे.
ठळक बाबी….
अरुणाचल प्रदेशात दर एक हजार पुरुषांमागे 1084 महिला असल्याची नोंद झाली असून त्याच्यापाठोपाठ नागालँड (965), मिझोरम (964), केरळ (963) आणि कर्नाटक (957) असा राज्यांचा क्रम लागतो आहे.
मणीपूर राज्यात अत्यंत वाईट स्त्री-पुरुष प्रमाणाची नोंद झाली आहे. मणीपूरमध्ये दर एक हजार पुरुषांमागे 757 महिला असल्याची नोंद झाली असून त्याच्यावरती लक्षद्वीप (839), दमण व दीव (877), पंजाब (896) आणि गुजरात (896) ही राज्ये आहेत.
राजधानी दिल्लीत स्त्री-पुरुष प्रमाण दर एक हजार पुरुषांमागे 929 एवढे आहे. जम्मू व काश्मीरमध्ये हे प्रमाण 952 एवढे आहे.
2018 साली जन्म नोंदणीचा दर 89.3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो 2009 साली 81.3 टक्के होता.सरासरी, जन्म किंवा मृत्यूच्या नोंदणीसाठी विहित कालावधी 21 दिवसांचा आहे.
कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना
कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला आहे.
मराठा विकास प्राधिकरणासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
तसेच कर्नाटक राज्यात तसंच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
तर अधिकृत आदेशानुसार, गेल्या कित्येक दशकांपासून कर्नाटक राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा विकास प्राधिकरणाचं मुख्य लक्ष्य समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे असणार आहे.
चीनने केला जगातला सर्वात मोठा व्यापार ‘करार’
चीनने जगातील सर्वात मोठा व्यापार करार करताना चौदा देशांबरोबर एक स्वतंत्र व्यापारी गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिजनल कॉम्प्रेहेन्सीव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप असे या गटाला नाव देण्यात आले आहे.
यात सहभागी झालेले बहुतांशी देश अशियातील आहेत. या करारासाठी गेली आठ वर्षे चर्चा आणि सल्लामसलती सुरू होत्या. त्याला आता अखेर आज अंतिम स्वरूप देण्यात आले. या संघटनेतील सहभागी देश एकमेकांशी खुला व्यापार करू शकणार आहेत त्यामुळे यातील सहभागी देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
या गटातून बाहेर राहण्याचा निर्णय भारताने या आधीच घेतला आहे.
चीन सह जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड असे देशही यात सहभागी आहेत.
या नियोजित गटातील सदस्य देशांची एकत्रित लोकसंख्या सुमारे दोनशे कोटींपेक्षा अधिक आहे. संपुर्ण जगाच्या एक तृतीयांश एवढी ही लोकसंख्या मानली जाते.